( २३ ) चालला असतां प्राग्ज्योतिष (ब्रह्मदेश किंवा आसाम) चा राजा भास्कर बर्मा यानें हर्षराजाबरोबर तह करण्याकरितां त्याजकडे पुष्कळ नजराणा पाठविला. तेव्हां हा शुभ शकुन झाला असें त्यानें मानले आहे. हर्षाची व भंडीची वाटेनें गांठ पडली, तेव्हां दोघांनी राज्यवर्धना- विषयीं फार शोक केला आहे. राज्यश्री ही अटकेतून सुटून विंध्याटवींत गेली, असें भंडीच्या सांगण्यावरून समजतांच हर्षानें भंडीस तूं सैन्य घेऊन गौडावर जा' असे सांगून तो आपल्या बहिणीचा शोध करण्यास 6 ● , • गेला. विध्याटवीत हर्षाची व दिवाकरमित्र बौद्ध भिक्षूची भेट झाली. हा ग्रहवर्म्याचा बालमित्र असल्याचें हर्षास माहीत होतें. तेथील अरण्यांत त्याची बहीण जीव देण्यास सिद्ध झाली होती, तिचीहि गांठ पडली. पुढे दिवाकर मित्रानें उभयतांचें सांत्वन केले. मग राज्यश्री ही विरक्ततेनें बौद्धदीक्षा घेण्यास सिद्ध झाली असतां ' माझे कर्तव्य उरकल्यावर मी व ही बरोबरच बौद्ध- दीक्षा घेऊं' असें हर्षानें बौद्धगुरूस सांगितले. त्यानेंहि त्याप्रमाणेच आपलें अनुमोदन दिलें. दिवाकरमित्राची विद्वत्ता, दयालुता व सदाचारतत्परता वगैरे गोष्टी पाहून हर्षानें दिवाकर मित्रास कांही दिवस आपल्याबरोबर राहून आपल्या बहिणीचे दुःख कमी करावे ह्मणून त्याची प्रार्थना केली, ती त्यानें मान्य केली. मग आपल्या बहिणीस घेऊन हर्षराजा दिवाकरमित्रासह आपल्या सैन्याचा तळ गंगातटाकी पडला होता तिकडे गेला. या गोष्टीच सविस्तर वर्णन हर्षचरितांत केले आहे. हर्षचरितांत कालनिर्णयाचा अभाव. हर्षचरितावरून पाहतां बाणकवीचे आईबाप, त्याचे इतर वंशज आप्त, मित्र, राहण्याचे ठिकाण, स्वभाव, विद्या, आचार, विचार इत्यादि- कांचा आणि त्याचा आश्रयदाता श्रीहर्ष याचा व त्याचे घराण्यांतील “ The enemies of brother are unpunished as yet, the neighbouring countries not brought to submission; while this is so, my right hand shall never lift-food to my mouth" Huen Thsang Vol. 1.P. 213 १ ' भवानपि कटकमादाय प्रवर्ततां गौडाभिमुखम् । , • ६. च. उ. ७. D
पान:बाणभट्ट.pdf/५०
Appearance