पान:बाणभट्ट.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४ )

चालू असल्याचे आढळून येतें. प्रतापवर्धन वारल्यावर हेर्पास दुःसह दुःख होऊन तो अत्यंत शोकाकुल होऊन बसला असतां, त्याचे दुःख निवारण करण्या- करितां हर्षाच्या पदरी असलेले पौराणिक येऊन व त्याच्या सभोंवतीं बसून त्यांनी पुराणांतील गोष्टींनीं त्याचें समाधान केले असल्याचें पुढें हर्ष- चरितांतच वर्णन आहे.
 बाणाच्या कादंबरीत देखील पुराणाचें कथन व श्रवण यांचा उल्लेख आहे. - "एके दिवशीं तारापीडराजा अंतःपुरांत गेला असतां आपली राणी विलासवती ही खिन्नवदन होऊन चिंताक्रांत बसली आहे, असे त्याच्या दृष्टीस पडलें. तेव्हां त्यानें खिन्नतेचें कारण तिला विचारिलें, परंतु तिजकडून कांही एक उत्तर मिळाले नाहीं. तेव्हां त्याने तिच्याजवळ सर्वकाळ असलेल्या मकरिकानांवाच्या दासीस विचारिलें असतां तिनें त्यास सांगितले की आज चतुर्दशी [ शिवरात्र ] असल्यामुळे महाकालशंकराच्या दर्शनास बाई-


[ मागील पृष्ठावरून पुढे चालू. ]


ह्या मत्स्य पुराणांतील प्रत्यंतर पुराव्यावरून तर ही गोष्ट अगदी सिद्धच होते.


सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणिच ।


वंश्यानुचरितंचेति पुराणं पंचलक्षणम् ॥


वायुपुराण.


 ह्या पुराणलक्षणाप्रमाणे असलेली आमचीं प्रसिद्ध अठरा पुराणें आणि महाभारत व रामायण यांत आमचा प्राचीन कालचा इतिहास भरलेला आहे असें असतां पुराणांत ' सर्व शिमगाच आहे! ' अशाप्रकारे आमच्या पुराणांस नांवें आमच्यांतच ' गोतास काळ " उत्पन्न व्हावे, हे आमचें दुर्दैव होय. आतां अत्युक्ति, अद्भुत वर्णन, फलश्रुतीचें प्रलोभन वगैरे गोष्टी यांत आहेत ही गोष्ट खरी; कांहीं पुराणांत मागाहूनहि कांहीं प्रकरणे घुसडून दिलेली असावी असेंहि दिसतें. तसेंच भविष्य पुराणांतहि नवीन नवीन भरती घाळून आतांच्या काळापर्यंत ऐतिहासिक वृत्त आणून ठेवलेले आढळतें! कांहीं पुराणें व्यासाच्या शिष्य-प्रशिष्य परंपरेनेंहि पुरी करण्यांत आलेली आहेत.
 १' देवमपि हर्षं तदवस्थं पितृशोकविव्हलीकृतं ( तं ) + + + शोकापनयन निपुणाश्च पौराणिकाः पर्यवारयन् ' इ०
 २ ' अद्य तु चतुर्दशीति भगवन्तं महाकालमर्चितुमितोगतया तत्र महाभारते वाच्यमाने श्रुतमपुत्राणां किल न सन्ति लोकाः शुभाः पुन्नाम्नो नरकात्त्रायत इति पुत्र

[ पुढे चालू. ]