पान:बाणभट्ट.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११ )


जनांत आले कीं, हर्षराजा हा उदारमनाचा व दयाळु खराच ! लहानपणच्या स्वच्छंदवर्तनामुळे मजवर लोकापवाद होते तरी त्याचें मजवर प्रेम दिसलें, त्याचा मजवर खरोखरीच रोष असता तर त्यानें आपली प्रसन्नता दर्शविली नसती ! मी आपली वर्तणूक सुधारावी व अधिक गुणवान् व्हावें, असा मात्र त्याचा रोख दिसला ! आश्रितांनीं अधिक गुणवान् व्हावें, असें इच्छिणें योग्यच आहे ! थोर असतात ते न बोलतां सवरतां आश्रितजनांस कृतीनेंच सद्गुणांचें शिक्षण देतात ! धिक्कार असो मला कीं अशा गुणवान् राजाविषयीं मी भलतीच कल्पना केली होती ! तर आतां माझे खरे स्वरूप त्याच्या ध्यानांत येईल अशी मी वर्तणूक ठेवीन. असा विचार करून तो राज- शिबिरापासून निघून आपल्या आप्तांच्या घरी जाऊन राहिला.
 यानंतर थोडक्याच दिवसांत बाणकवीची छाप हर्षराजावर पडून संतुष्ट झालेल्या श्रीहर्पाने बाणकवीस सन्मान, प्रेम, वित्त, विश्वास इत्यादिकांच्या परमावधीस नेऊन पोहोंचविलें !
 शरहतूंत बाण आपल्या घरीं आला, तेव्हां हर्पराजानें त्याचा मोठा स- न्मान केला ह्मणून त्याच्या आप्तमित्रांस फारच आनंद झाला. तो वर्णन करणे खरोखरीच अशक्य आहे !
 वाण मोठ्या आनंदानें आपल्या आप्तमित्रांसह हर्पराजाकडील व आपल्या पूर्वजांसंबंधी गोष्टी बोलत बराच वेळ बसल्यावर त्यांच्या बरोबर भोजन करण्यास उठला. भोजन होतांच पुनः त्याची आप्तमंडळी त्याजवळ येऊन बसली.

वाणाचे घरीं वायुपुराणाचें कथन व प्रसंगानें


(टीपेंत ) पुराणासंबंधानें विवेचन.


 मग सुदृष्टि नांवाचा पुराणिक नेहमीप्रमाणे पुराण सांगण्याकरितां आला.


 १ शरद्वर्णन व बाणाच्या आप्तमित्रांच्या भेटीचें हुबेहूच वर्णन शेवटच्या उता- ज्यांत दिले आहे ते पहा.
 २ ' विनीतमार्येच वेपं दधानः पुस्तकवाचकः सुदृष्टिराजगाम । नातिदूरवर्तिन्यां चासंद्यां निप्रसाद स्थित्वाच मुहूर्तमिव तत्कालापनीतसूत्रवेष्टनमपि नखकिरणैर्मृदु- मृणालसूत्रैरिव वेष्टितं पुस्तकं पुरोनिहितं शरशलाकायंत्र के निधाय पृष्ठतः सनीड- सन्निविष्ठाभ्यां मधुकरपारावताभ्यां दत्ते स्थानके प्राभातिकप्रपाटकच्छेदचिन्हीकृतमन्तर-

[ पुढे चालू ]