पान:बाणभट्ट.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २३४ ) मन्तरेण शाम्यति परिभवानलपच्यमानदेहस्य देवस्य दुःखदाहज्वर: सुदारुणः ।' परंतु क्वचिठिकाणचे श्लेष मनास प्रशस्त वाटत नाहींत. कादंबरीत- 'पुष्पवत्यपि पवित्रा । स्तनस्पर्शोहोमधेनुषु न कामिनीषु । निष्फलपुष्पदर्शन मंतःपुरमभूत् । कवि हे आपल्या वर्णन चातुर्यानें वाचकांच्या दृष्टीपुढे सृष्टीतील देखा- व्यांची हुबेहूब चित्रे उभी करतात. तशीं चितान्यांस देखील यावयाची नाहींत ! मासल्याकरितां पुढें थोडीं उदाहरणे दिली आहेत. व यांत खुबी- दार शृंगाररसहि भरलेला आहे. “आकाशकमलिनीमिव स्वच्छाम्बरदृश्यमा नमृणाल कोमलोरुमूलाम्।. अन्तः प्रविष्ट चन्द्रापीडस्पर्शलोभेनैव निपपात हृदये हस्तः स एवं स्तनावरणव्याजो बभूव । संभ्रमच्युतोत्तरीयका हारकिरणानुरास कर्तुमिछन्ती । मद्विलोकिता च धवलेन स्मिता लोकेन दुकूलेनैव लज्जयात्मां- नमावृणोति । अथाव्यक्तस्मितच्छुरितकपोलाधरलोचना लज्जया दशनांशुजाल- कव्याजेनांशुकेनेव मुखमाच्छादयन्ती ।' पहिल्या विशेषणांत तर पाश्चात्य व तदनुयायी यांच्या टेबलांवर विद्य- मान असणाऱ्या संभावित प्रतिमांची हुबेहूब अनुकृति उमटलेली आहे ! फरक इतकाच कीं येथें वस्त्राचा आड पडदा तरी आहे ! पाश्चात्यांच्या चित्रांत तर तो बराच वर व एकीकडे सारलेला असतो ! बाकीच्यांत स्तनावरण करणे, लाजून पदर घेर्णे, वगैरे प्रकारच्या शृंगार चेष्टा कवीनें दर्शविल्या आहेत, त्या शृंगाररसास अनुरूपच आहेत !