पान:बाणभट्ट.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २०५ ) राजकन्येस नृत्यगीतादि शिकविण्याची व ती तारुण्यांत आल्यावर विवाह करण्याची चाल. पुढील उतान्यावरून त्या वेळी राजकन्यांनी नृत्यगीतादि कला शिकवि- ण्याची चाल होती व राजे लोकांत तरी मुलींनीं तारुण्य प्राप्त झाल्याखेरीज विवाह करीत नसत असे दिसतें. यांत 'पयोधरोन्नति ' सारखे श्लेष पित्याच्या मुखांत नीट दिसत नाहीत हें खरें, तथापि हे बुद्धिपुरःसर नसून आपला कवि हा प्राधान्येकरून श्लेषप्रिय असल्यामुळे वर्णनाच्या भरांत त्याच्या मुखांतून सहजगत्या हे निघून गेलेले दिसतात. तसेंच 'केनापि कृता धर्म्या नाभिमता मे स्थितिरियम् ' है व पुढचें वाक्य यांदोहींतहि अर्थोहि कन्या परकीय एव ' ह्या कालिदासाच्या ह्मणण्याप्रमाणें प्रौढ विचार दिसत नाहीं ! असो, क्वचित् स्थळीं असे आढळले तरी इतर सर्व वर्णन व्यवहारास अनुसरून आहे व ते चांगलें साधलें आहे. 6 66 । अथ राज्यश्रीरपि नृत्यगीतादिषु विदग्धासु सखीषु सकलासु कलासु च प्रतिदिनमुपचीयमानपरिचया शनैः शनैरवर्धत | परिमितैरेव दिवसयौवनमारुरोह । निपेतुरेकस्यां तस्यां शरा इत्र लक्ष्यभुवि भूभुजां सर्वेषां दृष्टयः । दूतमेपणादिभिश्च तो ययाचिरे राजानः । कदाचितु राजान्तः पुरप्रसादस्थितो बाह्यकक्ष्यावस्थितेन पुरुषेण स्वप्रस्तावागतां गीयमानामार्यामशृणोत् । 'उद्वेगमहावर्ते पातयति पयोधरोन्नमनकाले । सरिदिव तटमनुवर्षे विविर्धमाना सुता पितरम्' तां च श्रुत्वा पार्श्वस्थितां महादेवीमुत्सारितपरिजनो जगाद 'देवि तरुणीभूता वत्सा राज्यश्रीः । एतदीया गुणवत्तेव क्षणमपि हृदया- नापयाति मे चिन्ता । यौवनारम्भ एव च कन्यकानामिन्धनीभवन्ति पितरः संतापानलस्य । हृदयमन्धकारयति मे दिवसमित्र पयोधरो- नतिरस्याः । केनापि कृता धर्म्या नाभिमता मे स्थितिरियं । यदङ्ग- संभृतान्यङ्कलालितान्यपरित्याज्यान्यपत्यकान्यकाकाण्ड एवागत्यासं- स्तुतैनयन्ते " कुलशील पाहून शरीरसंबंध १ रण्याची चाल. कुलशील पाहून शरीरसंबंध करण्याच्या संबंधानें प्रतापवर्धनानें यशोव- तीस आपले मत कळवून तिची याबद्दल संमति विचारली असतां तिनें