पान:बाणभट्ट.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. पं. वाचनाउन, ठिकाणी नसल्यामुळे ते अगदीं भयाण दिसत होतें! तेंच अतिसुंदर अछोद- सरोवर परंतु सांप्रत ते अगदीं शोभारहित व भेसूर असे त्यास दिसलें. मग त्यानें आपल्या लोकांस वैशंपायनाचा सावधगिरीनें शोध करण्यास सांगितलें व आपणहि त्याचा शोध करीत हिंडूं लागला. त्यानें तेथील लता- गृहें, देवळें व इतर ठिकाणे शोधिलीं, परंतु कोठें त्याचा पत्ता लागला नाहीं. मग त्याच्या मनांत आले की, मी येणार असे पत्रलेखेकडून त्यास कळून तो कोठं तरी दुसरीकडे निघून गेला असावा. तर आतां काय करावें ! हैं तोंड आतां आईबापांनां कसें दाखवावें? आतां तर माझे हात- पाय अगदीच मोडल्यासारखे झाले. मोठ्या आशेनें धरून ठेवलेले प्राण आतां जाऊं पहात आहेत ! शिव शिव ! मित्रदर्शन नाहीं ! व प्रियदर्शन हि नाहीं ! आतां बरीक मी सर्वस्वी बुडालों ! मग त्याचे मनांत आलें महा- श्वेता येथून जवळच रहाते, तर तिला कांहीं माहित असल्यास पुसावें. असा विचार करून आपले सैन्यास तेथेच तळ देण्यास सांगून तो तसाच महाश्वेतेकडे गेला. तेथें पाहतो तों, गुहेजवळच्या शिलातलावर खिन्न होऊन बसलेली महाश्वेता त्याच्या दृष्टीस पडली. तेव्हां त्याला वाटलें, देवी कादंबरी खुशाल असेलना ! नाहीं तर मला पाहिल्यावर ही अशी कधीं बसली नसती ! मग तो तिच्याजवळ गेला आणि तरलिका जवळ होती तिला झणाला, भगवती महाश्वेता अशी खिन्न का बसली आहे. तेव्हां ती महाश्वेतेच्या तोंडाकडे पहात उगीच उभी राहिली. मग दु:खानें सद्गदित झालेली महाश्वेता झणाली, " महाराज ! ही चांडाळीण काय काय कळविणार नाहीं ? पूर्वी स्वतःचे दुःख कळावेलें व आतां फिरून महाराजांच्या जिवास अपाय करणारी मी आणखी दुःखकारक वर्तमान सांगण्यास बसलेंच आहे. असो उपाय नाहीं ! आपण गेल्यावर मला वाटलें मी आईबापांचे मनोरथ पूर्ण केले नाहीत ! व प्रियसमागमानें सुखी अशी कादंबरीहि पाहिली नाहीं ! ह्मणून मला फार वाईट वाटून कादंबरीचे स्नेहपाश तोडून येथे येऊन उदासीन वृत्तीनें राहिले. पुढे एके दिवशीं वयानें व रूपानें महाराजासारखाच, चंचलदृष्टीनें कांहीं हरवलेली वस्तु पहात आहे , असा, ओळख नसून ब्राह्मण मजजवळ परिचितासारखा व उन्मत्तासारखा एक तरुण येऊन ह्मणाला, ' हे सुतनु ! तूं आपल्या अशा तनूची मजसारख्याच्या समागमानें सार्थकता के करीत नाहींस सुंदर कुरूप 11