पान:बाणभट्ट.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०१ ) बांधून त्याच्या स्वामी केले 1 असो. जे झाले ते झाले. परंतु आतां मला त्याचा संबंध नको. असा क्षणभर तिर्ने निर्धार केला, परंतु तिच्यानें फार वेळ तसें राहवलें नाहीं. तेव्हां ती आपल्या मंदिराच्या खिडकीतून त्याजकडे पाहत उभी राहिली ! इकडे चंद्रापीड त्या आरसेमहालांत जाऊन बैठकीवर बसला. त्याच्या मनोरंजनाकरितां केयूरक व गंधर्वकन्या गात च वाचें वाजवीत बसल्या. परंतु चंद्रापीडाचे अंतःकरण कादंबरीकडेच लागून राहिलें होतें. तो आपल्या मनांत ह्मणाला, गंधर्वकन्येचे हे कां साहजिक विलास ह्मणावे, कां प्रसन्न झालेल्या मदनानें मजकरितां हे प्रकार तिजकडून करविले असावे, विषयसुखेच्छा अनेक कल्पना करून मनुष्यास फसविते हे मात्र खरें ! तारुण्यांत मदनविकार उत्पन्न होऊन विचार नाहींसा होतो व अल्प असले तरी मोठें दिसतें ! व जी वस्तु प्राप्त होण्यासारखी नसते, तिजविषयीं देखील आशा उत्पन्न होते ! मग तो प्रमदवनाची शोभा पाहण्याकरितां क्रीडापर्वता. वर गेला. इकडे कादंबरीचें लक्ष चंद्रापीडाकडे असल्यामुळे तो दृष्टीस पडतांच कांहीं निमित्त करून ती गच्चीवर गेली व त्याजकडे पहात बसली ! मग महाश्वेता आल्याचे दासीनें कळविल्यावर ती संकटानें खाली उतरली. पुढे सर्वांनीं स्नान व उपहार केले. नंतर हिरव्यागार लतामंडपाच्या खाली चंद्रापीड बसला असतां एका- एकीं शुभ्र प्रकाश त्याचे दृष्टीस पडला. तो इतक्यांत शुभ्रवस्खें, हार, तुरे व गजरे घेऊन कादंबरीची सखी मदलेखा, केयूरक, व तमालिका यांसह स्वच्छ पात्रांत शुभ्र मौक्तिक हार घेऊन येत असलेली त्याचे दृष्टीस पडली. मग शुभ्र तेजाची वृष्टि करणारा तो हार दृष्टीस पडतांच त्याच्या मनांत आले की, दृष्टीस दिपविणारा जो प्रकाश पडला तो याचाच ! नंतर मदलेखा जवळ येतांच त्यानें तिचा सत्कार केला. मदलेखेनें चंद्रापीडाच्या अंगास उटी लावून व वस्त्र अर्पण करून पुष्पांचे हार घातले व तो मौक्तिकहार हातांत घेऊन ह्मणाली " महाराज, आपली अतिमनोहर आकृति पाहिल्यावर कोणाचें मन आसक्त होणार नाही ? माझ्या प्रियसखीचें असें मणणे आहे की, ज्यांनी येथे येऊन दर्शन दिले व जीविताचे साफल्य केले, त्यांचें मी कोणत्या रीतीनें उतराई व्हावें ? माझी सखी या हाराच्या मिषानें आपले