पान:बाणभट्ट.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६९ ) 15 MAY 2007 गंधर्वलोकाची व चित्ररथगंधर्वाच्या राजवाड्याची शोभा पहात पहात सात चौक ओलांडून कन्यान्तःपुरांत गेला. त्या ठिकाणीं सुंदर तरुणस्त्रियांची लावण्यप्रभा जिकडे तिकडे दिसत असल्यामुळे येथें चंद्रमंडळें उगवून अमृताची वृष्टिच होत आहे असे त्यास वाटले ! त्यांचे साहजिक विलास व हावभाव दिसत असल्यामुळे शृंगारमय, सौंदर्यमय व रतिमय असें तें अंतःपुर त्यास भासलें ! तो त्या अंतःपुरांतून चालला असतां अनेक प्रकारची कामे करीत असलेल्या कादंबरीच्या दासी त्याच्या दृष्टीस पडल्या. पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणीं पुष्कळ दासी उभ्या होत्या असा कादंबरीचा बसावया- चा श्रीमंडप त्याचे दृष्टीस पडला. त्या मंडपाच्या मध्याभागी पलंगावर बसलेली कादंबरी त्याचे दृष्टीस पडली ! तिचे सौंदर्य फारच अप्र तिम होतें. त्या ठिकाणच्या भिंतींवरून अनेक प्रकारची चित्रे काढलेली होतीं, त्यामुळे सर्व त्रैलोक्यांतील लोक तिला पाहण्याकरितांच आले आहेत असें दिसत होतें. तिचे सर्वावयव रेखलेले असून त्यांवर उत्तम वस्त्रालंकार असल्यामुळे फारच रमणीय शोभा दिसत होती. केयूरकानें सांगितल्यावरून ती त्याजवळ चंद्रापीडाची विचारपूस करीत होती.. कादंबरी दृष्टीस पडल्यामुळे चंद्रोदयानें समुद्रोदक जसे उचंबळतें त्याप्रमाणें चंद्रापीडाच्या अंतःकरणाची स्थिति झाली. त्यास असे वाटलें की ब्रह्मदेवाने माझ्या सर्वांगास डोळे केले असते तर फार चांगलें झालें असतें ! माझ्या नेत्रांनी पूर्वजन्मी खचित मोठे पुण्य केले होतें, ह्मणून ही सुंदरी माझ्या दृष्टीस पडली ! इतक्यांत कादंबरीचीहि दृष्टि चंद्रापीडाकडे गेली व केयूरकानें वर्णन केलेला पुरुष हाच, असे तिला वाटलें. तो दृष्टीस पडतांच तिच्या अंगावर रोमांच व अंतःकरणांत लज्जा ह्रीं उत्पन्न झाली ! + S मग महाश्वेता व कादंबरी या दोघींनीं एकमेकींस आलिंगन करून कुशल विचारले. नंतर महाश्वेता कादंबरीस हळूच म्हणाली, " भरत- खंडांत तारापीड ह्मणून सार्वभौम राजा आहे, त्याचा हा पुत्र आहे. याचें नांव चंद्रापीड. दिग्विजय करीत फिरत असतां हा या प्रदेशाकडे आला आहे. याची भेट झाल्यापासून मला हा आप्तासारखा वारत आहे. ब्रह्मदेवा: आहे ने सर्व सद्गुणांचा पुतळा असा हा निर्माण केला आहे. ब्रह्मदेवा २२ 1 JAN