पान:बाणभट्ट.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६६ ) चांडाळीण आहेस ! माझी तूं जवळ असतां मी येईपर्यंत याचे प्राण कसे राखले नाहींस ? कपिंजला ! प्रसन्न व्हा, आणि पुंडरीक जीवंत होईल असें करा. ' असे बोलून पटापट त्याच्या पायां पडूं लागले. याप्रमाणे अतिदुःखकारक वर्तमान सांगत असतां महाश्वेतेस मूर्छा आली. तेव्हां चंद्रापीडानें वाग घालून तीस सावध केलें. मग तो म्हणाला, " म्यां पाप्यानें तुमचा दुःखाग्नि पेटविला, याकरितां आतां सांगण्याचें पुरें करावें. आतां मला तें ऐकवत नाहीं ! " ती ह्मणाली, " महाराज ! त्या भयंकर रात्री देखील जी राहिली, तिला आतां काय व्हावयाचें आहे ? जे सांगितलें, त्याहून अधिक कष्टकारक असें सांगण्याचें तरी काय उरलें आहे? आतां हें भारभूत शरीर राखून ठेव- ण्यास काय कारण झालें तें सांगतें ऐकावें." त्या समयीं मी मरणाचा निश्चय करून तरलिकेस म्हटले, बाई तरलिके, आतां रडूं तरी कोठवर ? काष्ठे आणून चिता तयार कर; प्राणनाथाच्या मागून मला लवकर गेलें पाहिजे ! इतक्यांत चंद्रमंडळांतून एक पुरुष उतरला आणि पुंडरीकास उचलून घेऊन चालला, त्या वेळीं तो ह्मणाला, “ वत्से महाश्वेते, तूं प्राण सोडूं नकोस, फिरून तुझा याच्याशी समागम होईल. " असे आश्वासन देऊन तो आकाशांत गेला. तेव्हां मी चकित होऊन वेड्यासारखी झालें व हे आहे तरी काय ? असे कपिंजलास विचारूं लागलें. कपिंजल तर मला उत्तर न देतां गडबडीनें उठला व कंबर बांधीत ' अरे दुष्टा, माझ्या मित्राला घेऊन कोठें चाललास ? ' असें ह्मणत तोहि आकाशांत उडून गेला. असा प्रकार घडल्यानंतर पुढे काय करावे आणि काय न करावें, याविषयीं मला सुचेनासे झाले. मग मी तरलिकेस ह्मटले, 'तरलिके, तुला तरी हें समजलें काय ? ' तररालिका थरथर कांपत ह्मणाली, "बाईसाहेब! मला पापिणीला है कोठून समजणार ? परंतु हे मोठें आश्चर्य झालें खरें ! तो पुरुष तर देवासारखा दिसत होता, तो खोटें कशाला बोलेल ? कपिंजल- ऋषि त्याचे मागोमाग गेला आहेच; तो परत आल्यावर आपणास सर्व वर्तमान कळेल, तोपर्यंत जीव धारण करावा. " असे बोलून ती पटांपटां माझ्या पायां पडूं लागली. मला तिचे बोलणें खरें वाटलें त्यामुळे व कपिंजल परत येऊन सर्व सांगेल या आशेनें मीं प्राणत्याग केला नाहीं. नंतर