पान:बाणभट्ट.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६२ ) घातली ! हैं त्याला समजले सुद्धां नाहीं ! इतक्यांत माझी दासी येऊन मला ह्मणाली, " आईसाहेबांचें अंगधुणे होऊन घरीं जावयाची वेळ झाली, या करितां लवकर चला. " अशा तिच्या भाषणानें ऋषिकुमाराच्या लावण्यामृतांत गढलेली मी आपली दृष्टि बळेच काढून स्नानास जाण्यास निघालें! तेव्हां त्या ऋषिकुमाराचें अगदीच धैर्य गळालें, तें पाहून त्याचा मित्र ह्मणाला, “अज्ञान जनांच्या मार्गानें जाणे तुला योग्य नाहीं. अरे ! तें तुझें ज्ञान, तो तुझा निग्रह, तो गुरूंचा उपदेश, हें सर्वच कसें फुकट गेलें ! अरे ! तुला नकळत ही मुलगी तुझी माळ व तिजबरोबर तुझें मनहि घेऊन चालली, हें तुला समजलें सुद्धां नाहीं आं? अजून तरी तें आवरून घर. " असे भाषण ऐकून तो सलज्ज होऊन ह्मणाला, " कपिंजला ! तूं भलतीच काय कल्पना करतोस! या उनाड मुलांचा दांडगेपणा मी कधीं सहन करणार आहे काय ? " मग बळंच रागावल्यासारखे करून तो ह्मणाला, “ हे उद्धटमुली ! माझी माळ दिल्याखेरीज येथून जाशील तर खबग्दार ! " मग मी गडबडीनें आपल्या गळ्यांतील मोत्यांची माळ काढून " ही ध्या आपली माळ ! " असें ह्मणून त्याचे गळ्यांत घातली व मी तेथून निघून गेलें; तरी माझे सर्व लक्ष त्याज- कडे लागलें होतेंच. घरी गेल्यावर मला कांही सुचेनासे झाले. मग हे कोणाला सांगावें ! कोण याचा परिहार करील? अशी मला चिंता पडली. मग मी एकटीच खिडकीत बसून ज्या दिशेकडे तो ऋषिकुमार दृष्टीस पडला होता तिकडे वेड्यासारखी पहात बसलें ! 66 माझी दासी तरलिका बन्याच वेळाने माझ्या मागून आली. ती माझी अवस्था पाहून ह्मणाली, बाईसाहेब ! तुम्हाला एक गोष्ट सांगतें ती ऐका, तो ऋषिकुमार आपल्या सोबत्याची नजर चुकवून माझ्या मागें आला आणि त्याने मला तुमचें नांव, ठिकाण वगैरे सर्व विचारलें. मी हे सर्व त्यास सांगितलें. मग तो म्हणाला, 'मी तुला एकादी गोष्ट सांगितली तर ती तूं करशील?? मीं म्हटलें ‘ होय महाराज ! आपल्यासारख्यांचे दर्शन देखील दुर्लभ, मग अज़ा तर कोटली ? याकरितां आपण मनांत किंतू न आणतां खुशाल सांगावें ! ' मग त्यानें तमालपत्रांचा रस काढून वल्कलाच्या पट्टीवर कांहीं मजकूर लिहून मजजवळ देऊन म्हणाला, 'तुझी यजमानीन एकांती असतां ही पत्रिका तूं तिला दे.' असें तरलिकेचें भाषण ऐकतांच मला मोठाच आनंद झाला. व ती पत्रिका घेऊन पाहू लागले तो तीत " माझे पंचप्राण