पान:बाणभट्ट.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६० ) पडले होते; त्यांत राजहंस पक्षी क्रीडा करीत होते. मंद सुगंध व शीतल वायु वाहत होता. अशी अपूर्व शोभा पाहून माझें मन मोहित झाले व मी आपल्या सखीसह ह्या वनांत आनंदानें हिंडूं लागले. पुढे एकाएकी वायूच्या झुळकेचरोबर फारच मनोहर सुवास आला. त्या सुगंधा पुढे सर्व सुवास मला तुच्छ वाटले. मी डोळे मिटून मोठ्या आनंदानें तो सुवास घेत उभी राहिलें व तो कोठून आला ह्मणून शोध करूं लागलें. तों भ्रमरीप्रमाणे आकर्षिलेली अशी मी इकडे तिकडे पाहूं लागले, तो ह्याच सरोवरावर मित्रासह स्नाना. करितां आलेला एक दिव्याकृति तरुण ऋषिकुमार माझ्या दृष्टीस पडला. तेव्हां हा मूर्तिमंत वसंतच आहे, कांहा मित्रास भेटण्याकरितां मदनच आला आहे, असा तो मला दिसला ! त्याच्या कर्णावर एक पुष्पगुच्छ होता. पूर्वी कधीं न पाहिलेला असा तो पुष्पगुच्छ पाहून, जो मनोहर सुवास आला तो ह्याचाच असे मला वाटले. त्या ऋषिकुमारास पाहिल्यावर 'अति- सौंदर्य निर्माण करणान्या विधात्याचे किती तरी हे कौशल्य ! सर्व त्रैलोक्यांत सुंदर जो मदन त्यालाहि मार्गे सारणारा असा हा पुतळा त्यानें उत्पन्न केला आहे ! " याप्रमाणे माझ्या मनांत येत आहे तों पुप्पसरानें पराधीन झालेल्या भ्रमरीप्रमाणें तारुण्यांत उत्पन्न झालेल्या मदनविकाराने मला पराधीन केलें ! त्या कुमाराकडे मी पहात असतां जसे काय दृष्टीने त्याचें प्राशनच करते आहे, किंवा त्याच्या शरीरांत प्रवेशच करते आहे, अथवा हृदयांत मला जागा द्यावी ह्मणून त्याची प्रार्थनाच करतें आहें, अशी माझी स्थिति झाली. तेव्हां काय हें कुलीन कुमारीस कलंक लावणारें नीच कर्म मी आरंभिलें आहे असे जाणत असूनहि मी आपल्या स्वाधीन राहिलें नाहीं! आणि जशी काय इंद्रियांनी पुढे ओढीत नेलेली व मदनानें मागून लोटलेली अशी भी पुढे गेलें ! माझ्या सर्वांगास डवडव घाम सुटला व त्यानें जशी काय माझी लज्जा धुऊनच टाकली ! तेव्हां माझ्या मनांत आलें, ऋषिकुमारावर प्रीति बसविणाऱ्या कामदेवानें हें कांहीं बरें केलें नाहीं ! किंवा बायकांची जातच वेडी ह्मणावयाची ! तिला कोठें प्रीति करावी आणि कोर्डे न करावी हें कांहींच समजत नाहीं ! हें कडकडीत तप कोणीकडे आणि ह्या मदनाच्या चेष्टा कोणीकडे; याच्या दृष्टीस माझे हे ढंग पडले तर हा मला शापून भस्म करून टाकील! तर आतां जोपर्यंत मी शुद्धीवर आहे, तोपर्यंत येथून झदिशीं निघून जावं हें बरें ! नंतर असे मनांत आले की,