पान:बाणभट्ट.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५८ ) चालला आहे असे भासलें ! मग तो घोड्यावरून उतरून देवालयांत गेला. त्या ठिकाणी महादेवाचें लिंग त्याचे दृष्टीस पडले. त्याच्या समोर शंकरा ची आराधना करीत असलेली एक प्रौढ कन्या त्याच्या दृष्टीस पडली. तेव्हां शंकरास प्रसन्न करण्याकरितां ही रतिच तप करीत आहे की काय असें त्यास वाटलें ! तिची मूर्ति शिवलिंगांत प्रतिबिंबित झाल्यामुळे ही शिव- सारूप्यच पावली काय असे वाटत होतें ! ती तारुण्यभरांत होती तरी निर्वि- कार दिसत होती. ती वीणा वाजवीत शिवगुणानुवर्णन करीत होती, त्यामुळे ही साक्षात् गंधर्वविद्याच शंकराची आराधना करीत आहे असे भासत होतें ! चंद्रापीडानें शंकरास नमन केल्यावर तो विस्मय पावून आपल्या मनांत ह्मणाला, काय ज्या कधीं स्वप्नीं सुद्धां आल्या नाहीत अशा अतर्क्य गोष्टी पहा कशा जमून आल्या त्या ! तर आतां ही दिव्य स्त्री जर गुप्त होणार नाहीं तर ' तूं कोण व या वयांत अशी वृत्ति धारण करण्याचे कारण काय?' असें मी तिला विचारीन. मग, तो तिचें गाणें संपण्याची वाट पहात उभा राहिला. कांही वेळाने गाणे संपून तिर्ने महादेवास नमस्कार करून प्रार्थना केली, व ती तेथून उठून मंडपांत आली, तों तेथें तो तिच्या दृष्टीस पडला. मग ती त्यास ह्मणाली, अशा थोर पुरुषाचें इकडे येणें कशाकरितां झालें असेल तें असो ! तर आतां उठावें व मजबरोबर येऊन अतिथि सत्कार स्वीकारावा. तेव्हां चंद्रापीडानें अतिनम्रतेने तिच्या ह्मणण्याचा स्वीकार केला व तो तिच्या मागून लीनतेनें चालला. पुढे कांहीं अंतरावर एक गुहा त्याचे दृष्टीस पडली. तिच्या पुढें वृक्ष व लता फार दाटी होती. स्वच्छ उदकाचे प्रवाह गुहेजवळ पंडत असल्यामुळे ती बर्फानें आच्छादित झाल्यासारखी दिसत होती. त्या कन्येने गुर्हेत जाऊन आपली वीणा ठेवली. मग द्रोणानें झज्यांतील उदक घेऊन ती चंद्रापीडास अर्ध्य अर्पण करण्यास आली. तेव्हां तो ह्मणाला, एवढा सत्कार कशाला पाहिजे ? आपल्या सारख्याच्या दर्शनानेंच मी धन्य आहे. " असें त्यानें सटले तरी तिनें त्याचें पूजन केले. त्यानंहि नम्रपणानें त्याचा स्वीकार केला. चंद्रापीटाचे आदरा- तिथ्य केल्यावर ती जवळच दुसन्या शिलेवर बसली. थोडें भाषण झाल्यावर तिनें हातांत भिक्षापात्र घेऊन फलवृक्षांकडे जातांच आपोआप पडत अस लेल्या फळांनी तिचें भिक्षापात्र भरले ! मग ती फळे तिनें त्यास परमाद- रानें अर्पण केली. ते पाहून चंद्रापीडाच्या मनांत आलें कीं तपःसामर्थ्यास व यांची •