पान:बाणभट्ट.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५४ ) हा साक्षात् नारायणच अवतरला आहे असें त्यांनां वांटून त्यांनी त्यास नमस्कार केले नगरांतील खिडक्यांची दारें भराभर उघडल्यामुळे त्यास पाहण्याकरितां नगरानें आपले डोळेच उघडले काय असे वाटलें ! सर्व स्त्रिया आपापली कामें टाकून चंद्रापीडास पाहण्याकरितां आल्यामुळे सर्व शहर नारीमय व लावण्यमय असें दिसूं लागलें ! स्त्रियांनी चंद्रापीडाच्या अंगावर लाह्या व फुले उधळलीं ! मग तो राजवाड्यापाशी आल्यावर घोड्यावरून खाली उतरला. पुढें तो वैशं- पायनाचा हात धरून राजवाड्यांत चालला तेव्हां बलाहक सेनापति त्याच्या पुढें चालला होता. त्याठिकाणी अनेक हत्ती, घोडे, शिपाई, कारकून, न्यायाधीश, मांडलिक राजे व शस्त्रास्त्रांची ठिकाणे यांस पहात पहात ज्या ठिकाणी आपला पिता होता तेथें तो गेला. चंद्रापीड व वैशंपायन यांनीं नमन केल्यावर राजाने त्यांस आलिंगन करून आपल्याजवळ बसविलें. राजानें कुशल विचारल्यावर " तुझी माता तुझी फार वाट पहात आहे, याकरितां तिला अगोदर भेट. " असें पित्याचें भाषण ऐकून तो वैशंपायना- सह आपल्या आईकडे गेला व तिला नमस्कार करून उभा राहिला. विलासवतीने चंद्रापीडास जवळ घेऊन त्याच्या अंगावर हात फिरवून ह्मणाली, " बाळा, तुझा पिता खरोखरच फार निष्ठुर आहे ह्मणूनच त्यानें तुला इतके दिवस दूर ठेविलें ! तुझं धैर्यहि मोठेंच ह्मणावयाचें, कीं तूं खेळ- ण्यासवरण्याचें सोडून विद्याभ्यासांतच गढून राहिलास ! असो. तू विद्येनें भूषित जसा दृष्टीस पडलास, तसाच तुला साजणाऱ्या स्त्रीनें युक्त केव्हां दृष्टीस पडशील कोण जाणे ! " अर्से आईचं भाषण ऐकून चंद्रापीडास हसूं आलें. मग तो वैशंपायनासह शुकनास प्रधानाकडे गेला. मग दोघांनीं नमस्कर केल्यावर शकनासाने त्यांस आलिंगन दिले व जवळ बसविलें. मग त्यानें वस्त्रालंकरांनीं चंद्रापीडाचा सन्मान करून मोठा आनंद प्रदर्शित केला. तेथून ते दोघे मनोरमाबाई ( प्रधानस्त्री ) कडे गेले व तिला भेटून चंद्रापीड आपल्या मांदरांत गेला. चंद्रापीड दररोज आपल्या पित्याकडे जाऊन त्याने सांगितलेल्या गोष्टी लक्षांत ठेवित असे. तो वैशंपायन व इतर राजपुत्र यांजबरोबर अनेक शास्त्रीयविषयांची चर्चा करी व व्यायाम व मृगया करण्यासहि जात असे. एके दिवशीं सकाळीच कैलासनांवाचा चोपदार एक सुंदर कन्या बरोबर घेऊन चंद्रापीडाकडे आला आणि ह्मणाला. " राणीसाहेबांनी सांगि ३.