पान:बाणभट्ट.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४२ ) कारणानें वासुकी तीस आपल्या कंठांत धारण करीत असे. पुढे नागांनीं नागार्जुनास पाताळी नेले त्या वेळीं त्यानीं ती त्यास दिली. नागार्जुनाने ती सातवाहनराजास दिली व ती आतां परंपरेनें आमचेकडे आली आहे. ती धारण करण्यास तुजपेक्षां योग्य असा दुसरा कोण भेटणार आहे ? या करितां ती मी आतां तुला अर्पण करितों. तिचा तूं स्वीकार कर. " असे झणून त्याने ती त्याच्या गळ्यांत घातली ! त्यावेळी त्या ठिकाणीं चंद्रिके सारखा प्रकाश पडला, त्यामुळे हर्षास फार आश्चर्य वाटलें ! हर्ष ह्मणाला, गुरुजीच्या सद्गुणांस मी आपले शरीर अर्पण केले आहे. याकरितां घेण न घेणे हें कांहींच माझे स्वाधीन राहिले नाहीं ! या देहाचे धनी गुरुजी आहेत. पुढें एके दिवशीं राज्यश्रीनें आपल्या सखीजवळ कांहीं गोष्ट सांगून तीस हर्षाकडे पाठविलें. ती हर्षाजवळ येऊन ह्मणाली, " आपली भगिनी आपल्या समक्ष कधीं मोठ्याने बोलली सुद्धां नाहीं, मग दुसरी गोष्ट तर काय! परंतु दुर्दैवानें तिच्या सर्व गुणांचें मातेरें केलें ! स्त्रियांनां पति किंवा संतति यांचा आधार वाटतो! परंतु ज्यांना दोन्ही नाहींत, त्यांना आपले जीवित व्यर्थ वाटतें ? आपल्या भेटीमुळे राज्यश्रीचा मरणाचा निश्चय रहित झाला. तर आतां आपल्या बहिणीचें असें ह्मणणे आहे की मला बौद्धदीक्षा घेण्यास आज्ञा मिळावी. " तें ऐकून हर्ष उगीच चिंताक्रांत बसला. मग दिवाकरमित्र राज्यश्रीस उद्देशन ह्मणाले, अनेक गोष्टी पाहून व ऐकून ज्यांची अंतःकरणे कठिण झाली असतात, त्यांनां देखील प्रियजनाचा वियोग कठिण वाटतो. मग तुजसारख्या अबलेच्या कोमल अंतःकरणास तो दुःसह वाटतो आहे यांत काय नवल आहे ! प्रियविरह हा केवळ अग्निच आहे, किंवा यास क्षय- रोग झटलें तरी चालेल; अथवा है एक प्रकारचें प्रखर विषच झटलें तरी शोभेल, किंवा यास साक्षात् काळ झटले तरी चिंता नाहीं ! याच्या तावडीत सांपडलेल्या मनुष्यास सौख्य कसचें! परंतु जन्ममरणें, व सुखदुःखें हीं मनु- प्याच्या मार्गे नेहमीं आहेत, ती सर्व डोळे झांकून सहन केली पाहिजेत. तीं टाळण्यास कोण समर्थ आहे? हा तुझा वडील बंधू तुला पूज्य आहे. तो सांगेल त्याप्रमाणें तूं वागावेंस हैं योग्य आहे. " नंतर हर्ष दिवाकरमित्रास ह्मणाला, "अशा प्रसंगी अप्पलें दर्शन आह्मांस झालें, हे आमचं मोठेंच भाग्य होय. असे पुण्याचे आधारस्तंभ आहेत, ह्मणून