पान:बाणभट्ट.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४० ) बापडीस दोन गोष्टी सांगून तिचा जीव वांचविण्याचे श्रेय घ्यावें. कीटकादि- कांचा जीव रक्षण करण्याविषयीं देखील गुरुजींचें लक्ष असतें !" - हें वर्तमान ऐकतांच हर्षास वाटलें कीं, ही आपली बहीणच असावी. मग तो त्या बौद्धशिप्यास ह्मणाला, “ती स्त्री कोठून आली? तिच्या दुःखा- चे कारण काय ? वगैरे कांहीं कळले असल्यास सांगावें. " तो ह्मणाला, मी गुरुजींचें वंदन करून नदीतीरानें चाललों असतां एकाएकीं रोदनाचा शब्द माझ्या कानी पडला. त्याबरोबर मी तिकडे पाहूं लागलों तो कांहीं स्त्रिया जिच्याबरोबर आहेत अशी, रानांतील दगड, कांटे, व कुसळें टोंचल्यामुळे जिच्या अंगावर ओरखडे उमटले आहेत व जागजागी रक्त निघालें आहे अशी, व रडून रडून जिचे डोळे लाल होऊन सुजले आहेत अशी, अत्यंत दीन झालेली स्त्री माझ्या दृष्टीस पडली ! तेव्हां ह्या स्त्रीस आपण काय विचा रावें व कसें विचारावें असें माझ्या मनांत येत आहे तो त्यांपैकी एक स्त्री मजजवळ येऊन व माझ्या पायां पडून ह्मणाली, महाराज ! ही आमची स्वामिनी आईबापांच्या, पतीच्या व बंधूच्या मरणानें विरक्त होऊन व दुष्ट शत्रूच्या जाचास त्रासून आपला जीव देण्यास सिद्ध झाली आहे ! आपण बौद्ध भिक्षु आहां. सर्व प्राण्यांवर दया करणें हेंच बौद्धदीक्षेचें मुख्य तत्त्व आहे. भगवान् बुद्ध यानेंहि दया करणें हाच परम धर्म सांगितला आहे. प्राणरक्षणाहून दुसरा उत्तम धर्म नाहीं, याकरितां कृपा करून आमच्या स्वामिनीस दोन उपदेशाच्या गोष्टी सांगून तिचें शांतवन करावें. " यावर मीं झटले, " थोडा वेळ आपल्या स्वामिनीस आवरून घर, मजपेक्षां माझे गुरु आले असतां अधिक उपयोग होईल. ते फारच थोर व समर्थ आहेत. ते येथून जवळच राहतात. याकरितां मी त्यांना घेऊन येतों; ह्मणजे ते शास्त्रां- तील, पुराणांतील व इतिहासांतील अनेक बोधपर वचनें सांगून तिचें सांत्वन करतील. यावर ती मला नमन करून व हात जोडून ह्मणाली, 'जा तर लवकर, आणि त्यांना घेऊन या मग मी त्वरेनें इकडे आलों ! " १ असे त्यांचे भाषण ऐकतांच ही आपलीच बहीण असावी असें हर्षास वाटलें आणि तो दुःखित होऊन बौद्धगुरूस ह्मणाला, "गुरुमहाराज! एकंदर हकीकतीवरून ही माझीच बहीण असावी. याकरितां मजबरोबर लवकर येण्या- ची कृपा करावी !"मग तो त्या भिक्षूम ह्मणाला, 'मला लौकर तें स्थळ दाखवि- ण्याचें करावें. तेव्हां दिवाकरमित्रहि आपल्या शिष्यांसह राजाबरोबर निघा-