पान:बाणभट्ट.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३२ ) ह्मणाला, होता तो ह्मणाला: बाळा ! लावतां पुष्कळ वेळ हर्षास पाहून व त्याच्या अंगावर हात फिरवून राजा बाळा ! तूं इतका कृश कशानें झालास ? " तेव्हां भंडी जवळ महाराज, आपल्या प्रकृतीचें वर्तमान समजल्यापासून त्यांनी अन्नग्रहण देखील केलें नाहीं ! " राजा ह्मणाला, पितृभक्त आहेस ! तुझ्यासारखे पुरुष जगामध्यें फारच थोडे ! तुजवर माझे पंचप्राण अवलंबून आहेत, याकरितां तूं लवकरच जेव, ह्मणजे मीहि पथ्याचें घेईन. ” असें पित्याचें ममतेचें भाषण ऐकतांच हर्षास फारच गहिवर आला. नंतर तो पित्याच्या आग्रहावरून उपहार करण्यास गेला. त्यानें थोडेंसें अन्न ग्रहण केलें, परंतु त्यास चैन पडेना. मग त्यानें सर्व वैद्यांस बोलावून आणून पित्याच्या प्रकृतीविषयीं विचारलें. तेव्हां ते धैर्य देऊन ह्मणाले " आपण अगदीं धैर्य सोडूं नका. कांहीं दिवस गेले ह्मणजे महाराजांनां आराम पडेल!" त्यांतच राजपुत्राबरोबर वाढलेला व वैद्यशास्त्रांत निष्णात झालेला रसायन नांवाचा वैद्यपुत्र होता, तो तोंड खालीं घालून बसलेला होता. त्यास पाहून हर्ष ह्मणाला, ' रसायना, तुला तातांच्या प्रकृतीचें मान कसे दिसतें' तो ह्मणाला ' उद्या सकाळी मी काय तें सांगेन! ' ● इकडे राजा सर्व रात्रभर ज्वरदाहानें तळमळत पडला होता. रसायन व इतर वैद्य यांनी आपलेकडून पुष्कळ उपाय केले, परंतु त्याचा दाह कमी झाला नाहीं. पित्याची अवस्था पाहून हर्षास फारच वाईट वाटलें व ती रात्र त्याने मोठ्या दुःखानें घालविली. प्रातःकाल होतांच त्याने आपल्या भावाकडे सांडणी स्वार पाठविले. इतक्यांत 'रसायन ! " रसायन !" असें चहूंकडे लोक ओरडूं लागले ! तेव्हां शोधाअंती हर्षास असें कळून आले की, ज्यानें मुलाप्रमाणे आपले पालन केलें व ज्याच्या अन्नावर आपला देह वाढला त्याचा प्राण चालला असतां आपला कांहींच उपयोग झाला नाहीं, असें वाटून त्यानें अनींत प्रवेश केला ! तेव्हां हर्षास अतिशयच दुःख वाटलें. तो ह्मणाला, "मज हतभाग्यासारखा रसायन हा पित्याचें दुःख पाहण्यास राहिला नाहीं! धन्य त्याची! बरें पण मला तरी वांचून काय करा- याचे आहे ? अद्यापि हें हृदय फुटून त्याचे तुकडे कसे होत नाहींत ?" असें बोलून तो अत्यंत शोक करूं लागला ! तेव्हां जवळचे लोकहि त्याबरोबर शोक करूं लागले. इतक्यांत देवी यशोवती ही पतीच्या अगोदरच पर लोकास जाण्यास सिद्ध झाली, सणून चहूकडून मोठा आक्रोश ऐकू आला! तेव्हां