पान:बाणभट्ट.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३० ) असें बोलून राजानें सेवकांकडून त्या दोघांस बोलावून आणिलें व त्यांस पुत्रांच्या बरोबर राहण्यास सांगितलें. राज्यवर्धन व हर्ष यांनींहि पित्याची आज्ञा शिरसा मान्य केली. राज्यश्री ही नृत्यगीतादि सकलकलांमध्ये प्रवीण झाली. एके दिवशीं राजा आपल्या वाड्याच्या खिडकीत बसला असतां एका पुरुषानें झटलेली आर्या त्यानें ऐकिली. तींतील तात्पर्य असें होतें कीं, “ कन्या तरुण झाली असतां, नदी जशी तटास, तशी ती पित्याच्या अंतःकरणास पीडा करते !" हें ऐकल्यावर राजानें सेवकास दूर जावयास सांगून तो राणीस ह्मणाला, " आपली कन्या तरुण झाली आहे, यामुळे मला मोठी काळजी वाटत आहे ! याकरितां पुष्कळ राजांच्या मागण्या जरी आल्या आहेत, तरी कुल- शीलाचा विचार केला असतां थोर 'मौखरी' कुलांतील अवंतीवर्म्याचा थोरला पुत्र ग्रहवर्मा याला ती द्यावी, असें मीं मनांत आणिलें आहे! या करितां तुझ्या मनास कसे काय येतें ! ती ह्मणाली, मुलांनां वाढविण्यासवरण्याचें काम बायकांकडे असते. परंतु मुलगी देण्याचा विचार करणे हें पुरुषांकडे आहे ! माझे ह्मणणें इतकेंच आहे की, यावज्जीव आपल्याला तिची काळजी नसावी, असें सुस्थळ असावें." मग राजानें आपल्या दोघां पुत्रांस बोलावून त्यांसहि आपला विचार कळविला. नंतर सुमुहूर्त पाहून आप्तभित्रांसह ग्रहवयिस समारंभानें आणून राजानें आपल्या कन्येचा विवाह मोठ्या थाटानें केला. नंतर राजा व राणी यांनी आपले जावयास कांही दिवस आग्रहानें आपले घरीं राहून घेतलें. श्वशुरगृहीं असतां ग्रहवर्म्याचा काळ फारच आनंदांत गेला ! नंतर कांहीं दिवसांनी ग्रहवर्मा राज्यश्रीस बरोबर घेऊन आपल्या राजधानीस ( कनोज येथें ) गेला. पुढें कांहीं दिवसांनीं प्रभाकरवर्द्धन यानें आपला वडील पुत्र राज्यवर्द्धन यास बोलावून आणून त्यास उत्तरेकडील हूणलोकांवर स्वारी करण्यास सांगितलें. व त्याजबरोबर प्रधान, मांडलिक राजे आणि सैन्य देऊन त्यास शत्रूवर पाठ- विलें. आपले भावाबरोबर हर्षहि कांहीं मुक्कामांपर्यंत त्यास पोहचविण्यास गेला. पुढे हिमालयपर्वत आला तेव्हां अनेक प्रकारचे वन्य पशु पाहून, हें स्थान मृगया करण्यास फारच रमणीय आहे असें हर्पास वाहून, त्यानें तेथें नुक्काम करून कांहीं काळ मृगया करण्यांत घालविला. राज्यवर्धन हा शत्रूचा परा- भव करण्याकरितां पुढे गेला. एके रात्रीं पहाटेच्या प्रहरीं हर्षानें स्वप्नांत असें ●