पान:बाणभट्ट.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२६ ) मांडलिक राजे त्याला करभार देऊन त्याच्या सेवेत तत्पर असत. त्याचे प्रधान व आप्तमित्र हे सर्व त्याचे आज्ञेत असत. तो मुलाप्रमाणे सर्वप्रजेचें पालन करून सर्वांना आनंद देत असे. 66 महाराज एक याप्रमाणे तो राजा राज्य करीत असतां एकदां महाशैव असा भैरवाचार्य नांवाचा सिद्ध पुरुष आपले राज्यांत आला आहे असे त्यानें ऐकिलें तेव्हांपासून त्याचें दर्शन केव्हां होईल असे राजास झालें होतें. एके दिवशीं सायंकाळचे वेळेस एक द्वारपालिका येऊन राजास ह्मणाली, भिक्षु बाहेर आला आहे आणि भैरवाचार्याच्या आज्ञेवरून मी भेटीकरितां आलो आहे. " असे सांगतो आहे. मग राजाची आज्ञा होतांच ती त्यास घेऊन आली. राजानें त्या भिक्षूचा आदरसत्कार करून त्यास आसनावर बसविलें व 'भैरवाचार्य कोठें आहेत' ह्मणून विचारलें. तो म्हणाला, त्यांनीं " सरस्वतीनदीच्या काठच्या अरण्यांत ते एका देवालयांत आहेत. राजास शुभ आशीर्वाद सांगितले आहेत. " असे बोलून झोळींतून पांच रुप्याचीं कमळें काढून प्रसाद म्हणून राजास दिलीं. राजानें 'गुरूंचा हा मजवर मोठ च अनुग्रह झाला. ' असे ह्मणून ती परमभक्तीनें ग्रहण केली. नंतर 'उद्यां मी गुरूंच्या दर्शनास येईन' इत्यादि भाषण करून त्यास निरोप दिला. दुसरे दिवशीं प्रातःकाळी आपलेबरोबर थोडे लोक घेऊन राजा भैरवाचार्याच्या दर्शनास गेला. मग घोड्यावरून उतरून तो नम्रपणानें शिप्याने दाखविलेल्या बिल्ववाटिकंत गेला. त्याठिकाणी भिक्षुसमुदायाच्या मध्यभाग सारविलेल्या स्वच्छ भूमीवर व्याघ्राजिनावर बसलेले, व रुद्राक्षमाला ज्यांनीं धारण केल्या आहेत असे, महातेजस्वी चार्य त्याच्या दृष्टीस पडले. राजानें नम्रतेने जवळ जाऊन नमस्कार केल्यावर भैरवाचार्यानी त्यास आशीर्वाद देऊन व आदरातिथ्य करून बसावयास सांगितले. मग उभयतांचें कांहीं वेळ भाषण होऊन राजा आपले घरीं गेला. दुसरे दिवशीं भैरवाचार्य राजाच्या भेटीस गेले. तेव्हां राजानें मोठ्या गौरवाने त्यांचा सत्कार व पूजन केले आणि " हा देह व सर्व राज्यलक्ष्मी या चरणांस अर्पण केली आहे " असें झटलें. ते ह्मणाले, “राजा, हे वैभव कोणीकडे व अरण्यांत वाढलेले आह्मीं कोणीकडे ? तुझ्यासारखेच या वैभवा स योग्य आहेत. असो, आमच्या आज्ञेनें तूंच राज्य चालवावें. याप्रमाणे कांही वेळ भाषण करून राजास पांच रौप्यकमळें प्रसाद ह्मणून अर्पण करून भस्म भैरवा 66 व