पान:बाणभट्ट.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(3)

करणार नाहीत अशी आशा आहे. कांहीं काही ठिकाणी तर बुद्धाच लांबलचक पुरावे देणे भाग पडले आहे. याबद्दलहि विद्वज्जन क्षमा करतील अशी आशा आहे.
 खरोखर पाहिले अत अशा प्रकारचे प्रयत्न झटले झणजे वेशेषकरून आमच्या पदवीधर मठांकडून व्हावयास पाहिजेत. कारण, इंग्लिश, संस्कृत, इतिहास, अर्थशास्त्र इत्यादिकांच्या संस्कारांनी त्यांची बुद्धेि " मणिराकरोद्भवः । प्रयुक्तसंस्कार इवाधिकं बभौ" - या कालि दास कवीच्या वचनाप्रमाणे अनेक विद्यासंस्कारांनी उज्वलित झालेली असते. त्यामुळे केवळ चतुरस्रच काय, पण प्रौढ व तरतरीत झालेली असते! इत्यादि कारणामुळे इंग्लिश वगैरे ग्रंथकारांनी आमच्या इकडील ग्रंथकार, त्यांचे ग्रंथ व इतिहासादिविषय, इत्यादिकांच्या संबंधानें आपल्या पुस्तकांत कशी काय माहिती दिलेली आहे आणि ती आपल्या इंकडील जुने लेख, ताम्रपट इत्यादिक अनेक प्रमाणभूत लेखांतील माहितीशी जमते किंवा नाहीं, याबद्दल विचार करणे तसेंच, इतरांनी दिलेली माहिती विपर्यास केलेली अस ल्यास ती सप्रमाण खोडून काढून भारदस्त लेख लिहिणे, हे त्यांनां जसे साधेल तसे एकांगी विद्वानास साधावयाचें नाहीं ! परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की, अशा प्रकारचे किंवा दुसरे महत्त्वाचे उच्चप्रतीचे ग्रंथ लिहिण्याचे प्रयत्न पदवीधरां च्या संख्येच्या मानानें पाहिले असतां फारच थोड्या लोकांकडून झालेले आहेत. वर निर्दिष्ट केलेले डॉ. भांडारकर, कै. तैलंग, पंडित, न्या. रानडे लो. टिळक, वैद्य वगैरे कांहीं विद्वज्जनांनी मात्र इंग्रजीत असे कांहीं चागले उच्चप्रतीचे लेख लिहिले आहेत. परंतु मराठींत अनेक प्रमाणांचा मेळ घालून लिहिलेले ग्रंथ कोठें फारसे आढळण्यांत आले नाहीत. कै० विष्णुशास्त्री चिपळूणकर यानी मात्र कांही गोष्टींनी अल्पकालांत आपल्या मातृभाषेची चांगलीच सेवा केली, यांत कांहीं संशय नाहीं ! अशी फारच थोड्या लोकां कडून झाली असेल. याप्रमाणे इतर शेकडों पदवीधरांनीहि फुरसत करून अशा प्रकारचे प्रयत्न सुरू ठेवले असते तर आपल्या भाषेत आजपर्यंत केवढे ज्ञानभांडार झालें असतें ! कै० कृष्णशास्त्री चिपळूणकर, परशुराम तात्या गोडवोले यांजकडून, तसेंच हैरिपंत पंडित इ० पूर्वीच्या कांहीं


१ सदरहू गृहस्थांचे बरेच मार्मिक लेख 'विविधज्ञानविस्तार ' या मासिक पुस्तकात पूर्वी प्रसिद्ध झाले आहेत.

21 MAR 1990