पान:बाणभट्ट.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९३ ) बारल्याचे समजतांच पूर्वीचा सूड उगविण्याची संधि आलेली पाहून मालव राजानें ग्रहवर्म्यावर स्वारी करून त्यास मारलें व अशा रीतीनें पूर्वीचा सूड उगविला ! मालव व गौड या दोघांनींहि यावेळी ग्रहवर्म्यास व राज्यवर्धनास मारण्याकरितां कट केला असावा, असें हर्षचरितांतील व इतर कांहीं लेखांवरून उघड दिसतें. गौडराजा - शशांक यानें राज्यवर्ध नास मारण्याचा बेत केला होता; हें तर हुएनसँगच्या लेखावरून हि स्पष्टच होतें. मार्गे पान १६ यांत श्रीहर्षानें ब्राह्मणास अग्रहार दिल्याबद्दल ताम्रप गांतील लेख दिला आहे त्यांत आपला वडील बंधु राज्यवर्धन याच्या संबंधानें हर्षराजाने स्वतः त्या लेखांत त्याच्या घडून आलेल्या चरित्राचें सं क्षेपानें पद्यांत वर्णन केले आहे. ते पद्य फिरून येथेंहि देतो. 66 " राजानो युधि दुष्टवाजिन इव श्रीदेवगुप्तादयः कृत्वा येन कशाप्रहारविमुखाः सर्वे समं संयताः । उत्खाय द्विषतो विजित्य वसुधां कृत्वा प्रजानां प्रियम् प्राणानुझ्झितवानरातिभवने सत्यानुरोधेन यः " यांत सांगितलेल्या देवगुप्तादि ( आदिशब्दाने दुसरे मालवराजे किंवा हूण इ० असावे. ) शत्रूनां कडक शासन करून ( सत्यानुरोधानें ) विश्वास - ल्यामुळे त्यानें शत्रूच्या ( गौडाच्या ) घरी प्राणत्याग केला ! असें ह्मटलें आहे. ह्या वरील पद्यांत म्हटलेला देवगुप्त हाच मालव किंवा मालवराज असावा. हा माळव्याचा राजा असल्याबद्दल ( Epigra. Ind. 1,70. यांत आधार आहेच. गुप्त हे माळव्यांतील राजे होतेच. ह्या पद्यांत पुढे लागलीच राज्यवर्धनानें शत्रूच्या घरी प्राणत्याग केला अर्से आहे. यावरून वरील पद्यांत हर्षानें बंधूच्या संबंधानें धडून आलेल्या गोष्टींचा अनुक्रमानेंच उल्लेख केला असल्याचें लक्षांत येते. यांतील 'अरातिभवने ' ह्मणजे शत्रु गौडाच्या येथे असाच अर्थ असला पाहिजे. हाहि गुप्तांपैकीच होता. जनरल कनिंगह्याम यानें यास नरेन्द्रगुप्त असेहि झटले आहे. पुढें पान ९९ यांत शशांकाच्या मांडलिकानें ताम्रपत्रांत शशांकाच्या गुप्तशकाचाच निर्देश केला आहे. यावरून हा गुप्तराजांपैकींच एक होता असे उघड होतें. हा पूर्वेकडचा गुप्त होता. कांहीं गुप्त माळव्यांत होते व कांहीं बंगाल्याकडे होते. हर्षाची व भंडीची वाटेनें गांठ पडली आहे