पान:बाणभट्ट.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीसरे में. पं. वाचनालय, " मुळे पार्वतीपरिणय हें कोणाचें ? याविषयीं शंका उत्पन्न होणें साहजिक आहे. पंडित कृष्णमाचार्य यांनीं स्वोक्तीच्या समर्थनार्थ वामनभट्टबाणाच्या शब्दरत्नाकरांतील “ तेजोभिः पश्यते त्रिभिः " या वाक्याचें "तेजस्त्रयेण महता विहितेक्षणश्रीः " ह्या पार्वती परिणयांतील वाक्याशी समानार्थकता जमत असल्यामुळे दोन्ही पुस्तकांचा कर्ता वामनबाणच असावा असे एक प्रमाण दिलें आहे. सर्वत्र 6 आतां वीरनारायणचरित, शब्दरत्नाकर निघंटु, व शृंगारभूषणभाण ह्या ग्रंथांत वामनबाण, वामनभट्टबाण, अभिनववाण असेच कबीनें स्वनामनिर्देश केले आहेत आणि हर्षचरितांत व कादंबरींत केवल वाण ' ( बाणभट्ट असा देखील नाहीं ) नांवाचाच उल्लेख केलेला आहे. तसाच पार्वतीपरिणयांतहि आहे. पार्वतीपरिणयांतील वामन हे उपपद वामनबाण हा माहीत नसल्यामुळे वगैरे कारणांनी नष्ट झाले असावें, असेंहि पंडित कृष्णमाचार्य यांच्या कल्पनेनें भरारी मारली आहे. परंतु हें सर्वच प्रतीतून कसें नष्ट झाले ? हें मात्र नवल आहे ! याकरितां हे त्यांचें ह्मणणे मला तेरी युक्त वाटत नाही. तसेंच " कुचयुगुलं परिणद्धं यथा यथा वृद्धिमेति तन्वंग्याः । वराचितात्दृतमनसस्तथातथा कार्य मेति मे गात्रम्।।" आणि "आभोगशालि कुच कुडुलमायताक्ष्याः" इत्यादि “वर्णनं तु पुत्रीविषयकत्वादनुचितम् " असा पंडित कृष्णमचर्यानीं शेरा मारला आहे. "पार्वतीपरिणयांत कन्येच्या संबंधानें त्याच्या तोंडांत अशीं वाक्यें घातली आहेत, तशी प्राचीन बाणकवीने घातली नसती. तेव्हां हें नाटक वामनवाण याने केलेले असावें." अशी हि एक कोटी त्यांनी स्वोक्तीच्या समर्थनार्थ लढविली आहे. परंतु ही त्यांची कोटी वरपगात दिसली तरी मला ती तशी वाटत नाहीं. कारण. “ उद्वेगमहावर्ते पातयति पयोधरोन्नमनकाले । सरिदिव तटमनुवर्षं विवर्धमाना सुता पितरम् " ह्या हर्षचरितांतील पद्यांत " पयोधरोन्नमनकाले " हें कन्येच्या संबंधानें प्राचीन बाणकवीने घातलें आहे, इतकेच नव्हे तर “ देवि, तरुणी भूता बत्सा राज्यश्री: " " हृदयमन्धकारयति मे दिवसमिव पयो- धरोन्नतिरस्याः " असें पार्वतीपरिणयांतल्या प्रमाणेच पित्याच्या तोंडांत देखील घातले आहे. यामुळे हे “ आभोगशालि कुचकुड्मलमायताक्ष्याः १०