पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



खळबळ उडाली. पुढे १९३० ते १९३४ अशी पुढील ४ वर्षे सयाजीरावांनी नानासाहेबांना नोकरीत मुदतवाढ दिली.
 बडोद्यात स्थापन करण्यात आलेल्या स्थानिक मराठी वाङ्मय परिषदेच्या दोन अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही परिषदांच्या मानसन्मानस्वागताध्यक्षपदी नानासाहेबांची निवड करण्यात आली, तर डिसेंबर १९३४ मध्ये बडोद्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद नानासाहेबांनी भूषवले. यावेळी नानासाहेबांनी केलेल्या भाषणाचे उपस्थितांनी भरपूर कौतुक केले. या संमेलनात पाहुण्यांसाठी बडोदा फौजेची परेड ठेवण्यात आली होती. परेड पाहून उपस्थित पाहुणे प्रचंड खूश झाले. या परेडीचे अनेक वृत्तपत्रांनीदेखील कौतुक केले. १९३४ मध्ये बडोद्यातील 'मराठा समाजाच्या अध्यक्षपदी नानासाहेबांची निवड करण्यात आली. नानासाहेबांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेने ८ हजार रुपयांत जागा खरेदी करून तेथे मराठा जातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी 'मराठा बोर्डिंग' बांधण्याचा संकल्प सोडण्यात आला. २ वर्षानंतर १९३६ मध्ये युवराज प्रतापसिंह यांच्या हस्ते मराठा बोर्डिंगच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नानासाहेब 'मराठा समाजा'चे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते.
 २४ ते २६ जानेवारी १९३५ दरम्यान दिल्ली येथे झालेल्या हिंदुस्थानी फौजेच्या मनुव्हर्सला नानासाहेब बडोदा संस्थानचे

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ४७