पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ब्राह्मणाशिवाय इतरास देवाच्या पायाला स्पर्श करू देत नसत. मोठमोठे क्षत्रिय राजे महाराजे द्वारके स यात्रेस जात असत, त्यासही पदस्पर्श करू देत नसत. दि.ब. समर्थ यांनी ही चाल फार खुबीने मोडली. महाराज साहेबांस गोमतीत स्नान घालून त्यांच्याकडून द्वारकाधीशाची पूजा करविण्याचे ठरविले. महाराज साहेब प्रथम या गोष्टीस कबूल होईनात; परंतु हे करण्याचा मुख्य हेतू काय, हे समर्थांनी समजाविल्यावर महाराज साहेब दोन्ही गोष्टीस कबूल झाले. स्नान के ल्यावर पीतांबर नेसनू व अंगावर शालजोडी घेऊन महाराज साहेब द्वारकाधीशाच्या पूजेस गेले. महाराज साहेबांबरोबर मी व समर्थ दरबारी पोशाखात, जोड्याशिवाय होतो. महाराज साहेबांनी विधीपूर्वक पूजा के ल्यावर देवाच्या पायांस स्पर्श करून नमन के ले. आम्ही दोघांनीही पदस्पर्श के ला. गुगळी ब्राह्मण काही गडबड करण्याच्या तयारीत होते; परंतु समर्थांनी डोळे वटारताच ते चूप बसले. या दिवसापासनू क्षत्रियांस देवाचा पदस्पर्श करण्याच्या कामी हे ब्राह्मण आता हरकत घेत नाहीत.”
 द्वारका दौऱ्यात नानासाहेबांनी पार पाडलेल्या उत्तम कामगिरीबद्दल महाराजांनी त्यांचे कौतुक करून एक सोन्याचे घड्याळ, जरीचा भारी दुपेटा आणि कपड्यांसाठी पाचशे रुपये असे बक्षीस दिले. विशेष म्हणजे ए.डी.सी. पैकी असे बक्षीस

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ३५