पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(1८४) अर्थ-विषुवसंख्येत एक उणा करून [वाकीला ] दोहॉनी गुणावें आणि सहांनीं गुणावें [ह्मणजे ] पक्ष [होतात ]. पक्षांचे जे अर्ध ती तिथि विषुवान् जाणावी. माघशुक्लप्रवृत्तस्तु पौषकृष्णसमापिनः ॥ युगश्च पंच वर्षाणि कालज्ञानं प्रचक्षते ॥ ३२ ॥ यजुःपाठ-माघशुक्लप्रपन्नस्य पौषकृष्णसमापिनः ॥ युगस्य पंचवर्षस्य कालज्ञानं प्रचक्षते ॥ यांत "प्रपन्न" एथे“ प्रवृत्त " हा ऋपाठ ठेवून आणि बाकी यजुःपाठ घेऊन अर्थ असा : अर्थ-माघशुक्लाबरोबर प्रवृत्त झालेलें आणि पौषरुष्णाबरोबर संपणारे जे पच वर्षात्मक युग त्याचें कालज्ञान सांगतात ॥ ३२॥ तृतीयां नवमीं चैव पौर्णमासी त्रयोदशीं । षष्ठीं च विषुवान् प्रोक्तो द्वादश्या च समभवेत् ॥३३॥ अर्थ-तृतीया, नवमी, पौर्णमासी, षष्टी आणि द्वादशी या तिथीस [आणि पुनः अनुक्रमें याच तिथींस ] विषुवान् होतो. ॥ ३३ ॥ वेदांत विषुवान् दिवस आला आहे याविषयी मागे सांगितलेच आहे. उदगयन प्रवृत्तीपासून ३ सौरमासांनी एक विषुव आणि त्यापुढे ६ सौरमासांनी एक यात्रमाणे दोन विषुवे होतात. वेदांगज्योतिषाप्रमाणे तीन सौरमास म्हणजे ९३ तिथि होतात, आणि युगप्रवृत्ति माघारंभी होते म्हणून माघ, फाल्गुन, चैत्र हे तीन महिने जाऊन वैशाख शुक्ल ३ च्या अंती पहिला विषुवान् होतो. पुढे ६ सौरमास, ह्मणजे ६ चांद्रमास आणि ६ तिथि, जाऊन दुसरें विषुव होते. युगांतील सर्व विषुवे पुढे एका कोष्टकांत एकत्र दिली आहेत. मूळांत लें “त्रयोदशी पद लागत नाही. परंतु बाकी श्लोकाचा अर्थ वर लिहिल्याप्रमाणेच आहे हे उघड आहे. सरक चतुर्दशीमुपवसथः तस्तथा भवेद्यथोदितो दिनमपैति चंद्रमाः माघशुक्लान्हिको युंक्त श्रविष्ठायां च वाषिकी ।। ३४ ।। सातवें अक्षर “ थः"हे काढून टाकून अर्थ असा लागतो. अर्थ-[कृष्ण ] चतुर्दशीच्या दिवशीं [चंद्र सूर्य ] जवळ असतात. चंद्रमा असा असतो की तो उगवला असतां दिवसाप्रत प्राप्त होतो. माघशुक्ल [प्रतिपदच्या ] दिवशी श्रविष्ठा नक्षत्री सूर्याशी योग पावतो. तसेंच वर्षाऋतूच्या [ आरंभापूर्वीच्या अमावास्येच्या अंती ] [ योग पावतो ] ॥ ३४ ।।. दिवसाप्रत प्राप्त होतो ह्मणजे तो उगवल्यावर लागलाच सूर्योदय होऊन दिवस सुरू होतो. माघशुक्ल प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे अमावास्या आणि प्रतिपदा यांच्या संधीस असें घ्यावयाचे. दर अमावास्येस सूर्यचंद्रांचा योग होतोच. असे असून दोनच अमावास्या सांगण्याचे कारण एवढेच की, अमांतीं उदगयन किंवा दक्षिणायन सुरू होते, असें युगांत दोनदाच होतें. एकदा पहिल्या संवत्सराच्या आरंभी माघारंभी उदगयन प्रवृत्ति होते, आणि तिसऱ्या संवत्सरांत श्रावणाच्या आरंभी दक्षिणायन प्रवृत्ति होते. (२) यजुर्वेदज्योतिष.) एकांतरोन्हि मासे च पूर्वादृत्वादिरुत्तरः ॥ ११ ॥ अर्थ-पूर्व ऋतूच्या आरंभापासून एक दिवसाआड आणि एक महिन्याआड उत्तर ऋतूचा आरंभ [ होतो.]