पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७१) संशय दाखविला आहे असे दिसते. परंतु आपल्या वैदिकांच्या पाठांत लगध असें आहे याविषयी काहींच* संशय नाही. दोन्ही ज्योतिषांतले जे श्लोक लागतात त्यांतील विशेष महत्वाच्या श्लोकांचा अर्थ खाली दिला आहे. त्यांत प्रथम ऋग्वेदज्योतिष दिले आहे. वैदिकांच्या तोंडी जो पाठ आहे, तो प्रथम जशाचा तसा दिला आहे. पुढे तोच श्लोक यजुर्वेदज्योतिषांत असल्यास त्याचा सोमाकर पाठ भिन्न असून अर्थास उपयोगी पडत असल्यास तेवढा दिला आहे. त्याहून जास्त पाठभेद करणे अवश्य वाटले तेथे तोही दाखविला आहे. पुढे दोहों ज्योतिषांत सारखे असलेले श्लोक खेरीज करून यजुर्वेदज्योतिषांत जे जास्त श्लोक आहे त्यांतले लागलेले तेवढे दिले आहेत. श्लोकांत जेथेल्या तेथे काही विचार केला आहे व शेवटी सामान्यतः काही विचार केला आहे. ऋग्वेदज्योतिषाचा अर्थ लावतांना वैदिकपाठ जितका राखता येईल तितका राखावयाचा प्रयत्न केला आहे. प्रथम पाहण्याच्या सोईकरितां खाली कमाठ आणि यजुःपाठ यांतील श्लोकांक अनुक्रमें देऊन प्रत्येक पाठाचा प्रत्येक श्लोक दुसन्या पाठाचा कितवा हे समजण्याकरितां त्यांचे अंक येथे देतो. ऋक् यजुः ऋक् यजुः यजुः ऋक् यजुः ऋक् यजुः ऋक् पाठ पाठ पाठ पाठ पाठ ११९ १९ ३७ ० २०२२२३ २० २ २१ २ ३ ३६ २०२१ ३९ १८ पाठ पाठ पाठ पाठ ११ د له س २३ ३१ ه ع م م و م ه ه ه ه ه ° 02 022 °४ m mm MU09000०००। ३१ ३१ २३ १३४ १४१८३२५ १४ ३४ ३८ २४३५४१७ १५३५२८ ३९ १८

  • डा. केर्न याने आर्यभटीय छापिलें आहे. त्याच्या प्रस्तावनेत त्या सिद्धांतावरील भटप्रकाशिका टीकेंतला कांहीं उतारा मूळच्या मलयलम लिपीतल्या पुस्तकावरून दिला आहे. त्यांत एका ठिकाणीं टीकाकाराने " तथाच लगडाचार्यः" असं ह्मणून वेदांगज्योतिषांतले. दोन श्लोक दिले आहेत. यांत "लगड" असें आहे. त्या प्रांतांत वैदिक ब्राह्मण ऋग्वेदज्योतिष मणत असल्यास ते " लगड" असें ह्मणतात की काय हे पाहिले पाहिजे. कदाचित् मलबारी लिपीत ड आणि ध यांचं फार साम्य आहे, यामुळे ही चूक झाली असेल.