पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शब्द आहे. इतक्या गोष्टी तैत्तिरीयश्रुतीहून भिन्न आहेत. बाकी दोहोंची एकवाक्यता आहे. कांहीं नक्षत्रांची लिंगवचनें स्पष्ट अमकीं असें दिसत नाही, तरी ती तैत्तिरीयश्रुतीप्रमाणेच आहेत असें मणण्यास चिंता नाही. प्रोष्ठपदांविषयी मात्र संशय आहे. काही स्थली (२.८.१; ३. ७.४.) 'विचूतौ नाम तारके ' असें आलें आहे तें मूळ नक्षत्रास अनुलक्षून आहे असे दिसतें. नक्षत्र शब्दाची व्युत्पत्ति तैत्तिरीय ब्राह्मणांत अशी आली आहे. प्रबाहुग्वा अग्रे क्षत्राण्यातेपुः ॥ तेषामिंद्रः क्षत्राण्यादन ।। नवा इमानि क्षत्राण्यभूवन्निति ॥ तन्नक्षत्राणां नक्षत्रत्वं ।। तै. ब्रा. २.७.१८.३. जी क्षत्र नव्हत ती नक्षत्रे इतकेंच याचे तात्पर्य दिसते. “ नक्षत्राणि नक्षतेर्गतिकर्मणः ॥ असें नक्षत्र शब्दाचें निर्वचन निरुक्तांत करून पुढे “नेमानि क्षत्राणीति च ब्राह्मणं " असें मटले आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत दुसरे एके स्थलीं असें आलें आहे: सलिलं वा इदमंतरासीत् ॥ यदतरन् ॥ ततारकाणां तारकत्वं ॥ यो वा इह यजते ॥ अमु.५ स लोकं नक्षते ।। तनक्षत्राणां नक्षत्रत्वं ॥ देवगृहा वै नक्षत्राणि ॥ य एवं वेद । गृह्येवभवति ॥ यानि वा इमानि पृथिव्याश्चित्राणि ॥ तानि नक्षत्राणि ॥ तस्मादश्लीलनामश्चित्रे || नावस्येत्रयजेत ॥ यथा पापाहे कुरुते ॥ तादृगेव तत् ॥ ते. ब्रा. १.५.२. मध्ये उदक होते. [तें ] ज्याअर्थी तरल्या त्याअर्थी तारकांचे तारकत्व. जो येथे यज्ञ करितो तो त्या लोकांस जातो (नक्षते ); ह्मणून नक्षत्रांचे नक्षत्रत्व. नक्षत्रं देवांची गृहे होत. जो हे जाणतो तो गृही होतो. जी ही पृथ्वीची चित्रं ती नक्षत्रे. ह्मणून वाईट नांवाच्या नक्षत्रावर [ एकादें कर्म ] संपवू नये आणि यज्ञ करूं नये. पापकारक दिवशीं करावें त्याप्रमाणेच तें. ही वाक्ये महत्वाची आहेत. तारका शब्दाची व्युत्पत्ति ही केवळ शब्दावर कोटि दिसते. दुसरी व्युत्पत्ति गत्यर्थक नक्ष धातूपासून सांगितली आहे. आणि त्यांतील ह्या लोकींचे पुण्यात्मे स्वर्गी नक्षत्रे होतात ही कल्पना ध्यानात ठेवण्याजोगी आहे. सांप्रतही जगांतील पुष्कळ राष्ट्रांची अशी समजूत असेल. नक्षत्रं हींदेवांची गृहे हे वाक्य फार महत्वाचे आहे. एथें देव शब्दाने नक्षत्रांतून संचार करणाऱ्या प्रत्यक्ष प्रकाशमान ग्रहांवांचून कोण घ्यावयाचे? आणि नक्षत्रे देवांची गर्ने यापासूनच “गृह्णातीति ग्रहः" अशा व्युत्पत्तीने शुक्रादि तेजोमय देवास ग्रह ही संज्ञा लागू लागली असावी. पृथ्वीची अर्थात् पृथ्वीवरील वस्तूंची चित्रे ती नक्षत्रे ही व्युत्पत्ति पाहिली असतां आकृतीवरून नक्षत्रविशेषांस नांवें पडली असतील असा संभव दिसतो. परंत कांहीं नक्षत्रांची नांवें दुसन्याच कारणाने पडलेली दिसतात. प्रत्येक नक्षत्राची व्यत्पत्ति इत्यादि वेदांत काय सांपडते हे पाहूं. नक्षत्रवाचक शब्दांपका पुनर्वस चित्रा, रेवती, हे शब्द नक्षत्रवाचक नव्हत, परंतु इतर अर्थानें ऋकसहितत आने आहेत. ते एथे देतों मणजे त्यांवरून नक्षत्रसंज्ञांचा अर्थ समजण्यास साधन होईल अग्नीषोमा पुनर्वसू अस्मे धारयतं रयिं ॥ क. सं.१०.१९. पा