पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४१) चंद्र पूर्ण होतो असें नाहीं. सत्ताविसांपैकी प्रत्येकावर कधीना कधी पूर्ण होतो. आ. णखी एक मोठी अडचण अशी की, पर्णचंद्र अगदी जवळ आला तरा ज्याच्या तारा दिसतात अशी सत्तावीस नक्षत्रांत फक्त मघा, ज्येष्ठा, चित्रा, रोहिणी एवढीच ४ नक्षत्रे आहेत. कांहींपासून ७८ अंशांवर चंद्र आहे तोच व काहा तर याहूनही चंद्र दूर असतांच दिसेनाशी होतात. सारांश नक्षत्रांस नाव पडल्यापासून नियमित नक्षत्रांशी चंद्र पूर्ण होणे याबद्दल निश्चय ठरण्यास पुष्कळ काल लाटला पाहिजे हे उघड आहे. हें ज्ञान झाल्यावर चैत्री, वैशाखी इत्यादि सज्ञा पूाणमास लागं लागणे ही पुढची पायरी, आणि त्यांवरून पढें चैत्रादि संज्ञा स्थापित हाण हा त्याच्यापुढची पायरी. सारांश ऐतिहासिक दृष्टया आणि नैसर्गिकदृष्टया पाहिले तर मध्वादिसंज्ञांनंतर पुष्कळ कालानें चैत्रादि संज्ञा प्रचारांत आल्या असें सिद्ध होते. सावन आणि चांद्र हे मास वेदांत आहेतच. परंतु तसा सौरमासाचा निर्देश कोठे स्पष्टपणे आढळला नाहीं. भचक्राचे बरोबर १२ भाग सौरमास. केले असता त्यांतील एकेक क्रमिण्यास सूर्यास लागणारा जो काल तो सौरमास. मेषादि राशिसंज्ञा वेदांत नाहीत. त्या नसोत. परंतु त्यांसारखी दुसरी कांहीं नांवें भचक्राचे १२ विभाग कल्पून त्यांस दिलेली कोठे आढळत नाहींत. आतां मधुमाधव ही मासनामें वेदांत आहेत ती सौरमासांची नव्हत असें निश्चितपणे म्हणता येणार नाही. कारण त्यांच्या अर्थाचा संबंध ऋतूंशी म्हणजे मूयांशी आहे इतकेंच नाही, तर मध्वाादकांस ऋतु अशीही संज्ञा आहे. (पृ. २९ पहा.) तथापि त्यांचा अंत पूर्णिमा किंवा अमावास्या यांखेरीज इतर दिवशीं होत असे असे विधान कोठे आढळत नाहीं. पूर्णिमा किंवा अमावास्या यांवर मासान्त होतो असे निर्देश आहेत. तेव्हां हीं नांवें चांद्रमासांचींच म्हणजे पूर्णिमा किंवा अमावास्या यांवर संपणान्या मासांचीच होत असे दिसते. तथापि वर्ष सौर होते हे निर्विवाद आहे, त्याअर्थी सौरमासही चांद्रमासांहून निराळ्या मानाचे असे कां नसतील ? ते असावे व मध्वादि संज्ञा चांद्रमासांसही लागत त्याप्रमाणेच सौरमासांसही लावीत असतील असें ह्मणण्यास जागा आहे. आतां चांद्रमास हे पूर्णिमान्त होते की अमान्त याविषयी विचार करूं. अमावास्येला ज्या महिन्याचा अंत होतो तो अमान्तमास. पूणिमान्त आणि आणि पूर्णिमेला ज्याचा अंत होतो तो पूर्णिमान्त. वेदांत हीं अमान्त मास. दोन्ही माने आढळतात. जिच्यावर मास पूर्ण होतो ती पौर्णमासी. तेव्हां पौर्णमासी या शब्दावरूनच पौर्णिमान्त मान दिसुन येतें. बहिषा पूर्णमासे व्रतमुपैति वत्सैरमावास्यायां ॥ तै. सं. १. ६.७. . यांत अमावास्येच्या जोडीला " पूर्णमास" हाच शब्द आहे यावरून पौर्णमासीला मास पूर्ण होतो असें होतें. उत्सर्गिणामयन यासंबंधे अनुवाकांतील अमावास्यया मासान्संपाद्याहरुत्सृजति अमावास्यया हि मासान् संपश्यंति पौर्णमास्या मासान्संपाद्याहरुत्सृजति पौर्णमास्या हि मासान्संपश्यति ॥ तै. सं. ७. ५. ६. १.