पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिले आहे. यामुळे काही गोष्टी स्थूल निघतात हे खरे तरी इतर करणग्रंथांत हीच अवस्था आहे. उपसंहारांत गणेश ह्मणतो: पूर्व प्रौटतराः क्वचित् किमपि यत् चक्रुर्धनज्ये विना ते तेनैव महातिगर्वकुमृदुच्छंगडधिरोहति हि ॥ सिद्धांतोक्तमिहाखिलं लघुकृतं हित्वा धनुज्ये मया तो मयि मास्तु किं न यदहं तच्छास्त्रतो वृद्धधीः ॥ याचे तात्पर्य असे की, "पूर्वीच्या प्रौढतरगणकांनी क्वचित् कांहीं गणितकर्म ज्याचापावांचून केले, तेवढ्यानेच ते गर्वाच्या शिखरास चढले*. मग मी सिद्धांतोक्त सर्व कर्म ज्याचापावांचून केलें असतां मला त्यांसारखा गर्व कां न व्हावा ? परंतु तो न व्हावा. कारण त्यांच्याच ग्रंथांवरून मला ज्ञान झालें." सिद्धांतांतले सर्व मी ग्रहलाघवांत आणिलें हें गणेशाचे म्हणणे खरे आहे; आणि यामुळेच ग्रहलाघवास सिद्धांतरहस्य असें नांव पडले आहे. पुष्कळ करणग्रंथ मी पाहिले. त्यांत पुष्कळांत ग्रहस्पष्टीकरण मात्र आहे. सिद्धांतोक्त बहुतेक कर्म ज्यावरून होईल असे करणकुतूहलादि ३।४ मात्र आहेत. परंतु त्या सर्वांत ग्रहलाघवा इतका पूर्ण दुसरा कोणताही नाही. याजवर गंगाधरकृत टीका शके १५०८ ची, मल्लारिकृत टीका शके १५२४ ची व विश्वनाथाची सुमारे शके १५३४ ची आहे. आणखीही काही टीका आहेत. बाशी एथे शके १६०५ मध्ये लिहिललें ग्रहलाघवाचें एक पुस्तक मला आढळले. यावरून ग्रहलाघव लवकरच दूरदूरच्या देशांत पसरला असे दिसते. सांप्रत सर्व महाराष्ट्रांत, गुजराथेत व कर्नाटकाच्या बऱ्याच भागांत यावरूनच गणित करितात. काशी, ग्वालेर, इंदूर इत्यादि प्रांतांत दक्षिणी लोकांत हाच ग्रंथ चालतो.t इतर प्रांतांतही हा बराच प्रचारांत आहे असे वाटते. ज्यांतील गणितपद्धति अगदी सुलभ आणि ज्याच्या योगाने सिद्धांताची गरज मुळींच रहात नाही असा हा ग्रंथ लवकरच सर्वत्र पसरला आणि त्यानें पूर्वकरणग्रंथांस मागे टाकले हे साहजिक आहे. ग्रहलाघवोक्त ग्रहांची आधुनिक युरोपियन ग्रंथांवरून येणाऱ्या ग्रहांशी सूर्यसंबंधे ग्रहशुद्धि. तुलना केली असतां शके १४४२ च्या आरंभी ग्रहलाघवोक्त मध्यमग्रह किती जास्त कमी येतात हें खाली दाखविले आहे. अंश कला अंश कला रवि. . . बुधशीघ्रोच्च + ८ २१ चंद्र - २ गरु चंद्रोच्च + १ ५५ शुक्रशीघ्रोच्च+१ २२ राहु - १७ शनि + १ मंगळ + ४४ यांत बुध फार चुकला आहे. शुक्र, शनि, चंद्रोच्च यांत १ पासून २ अंशपर्यंत चुकी आहे. बाकीचे १ अंशाच्या आंतच चुकीचे आहेत. चंद्र तर फारच सूक्ष्म करणकुतूहलांत त्रिप्रश्नाधिकारांत भास्कराचार्य ह्मणतो." इति कृतं लघकार्मुकशिंजिनीग्रहणकर्म विना द्युतिसाधनं ।। १२ ।।" +इंदर, ग्वालेर एथे सरकारी पंचांग ग्रहलाघव आणि तिथिचिंतामणि यांवरून होते; आणि त्या संस्थानांत सर्वत्र बहुधा तेच चालतें. दक्षिण हैद्राबाद संस्थानच्या पुष्कळ भागांत ग्रहलाघवी पंचांगच चालते. ० ० ०