पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९९) साधले आहेत. चांगल्यावाइट ज्ञानाच्या समुद्रांतून देवताप्रसादाने, किंवा स्वबुद्धीनेच त्यांत बुडी मारून, सत्यज्ञानरूपी रत्न म्यां काढले. ग्रहणे, युति, इत्यादिकांवरून मध्यगतिही काढता येईल, परंतु त्यांवरून मुख्यतः स्पष्टग्रहस्थिति समजते. यावरून आणि पूर्वी लिहिलेल्या इतर आधारांवरून असें दिसून येते की ग्रहस्पष्टीकरणांत आर्यभटाने सुधारणा केली; तसेंच पूर्वीच्या ग्रंथांचा सारासार विचारानें, स्वबुद्धीने आणि वेधाने त्याने नवीन शोध केले. यावरूनही त्याची मोठी योग्यता दिसून येते. बृहत्संहिताटीकेंत उत्पलाने आर्यभटीयांतील पुष्कळ आर्यांचे अवतरण केलें आहे. आणि त्यानंतरच्या बऱ्याच ग्रंथांत त्याची वचनें असार अन्याया आढळतात. लल्लु नामक जो प्रख्यात ज्योतिषी झाला तो आर्यभटाचा अनुयायी आहे. त्याने आर्यभटोक्त ग्रहगतीस बीजसंस्कार दिला आहे. करणप्रकाशनामक जो शके १०१४ मध्ये झालेला आर्यपक्षाचा करणग्रंथ तो आर्यभटोक्त भगणांवरून येणाऱ्या ग्रहगतिस्थितीस लल्लोक्तबीजसंस्कार देऊन केलेला आहे. (हे पुढे सविस्तर दाखविण्यात येईल.) तसेंच भटतुल्यनामक जो दामोदराचा करणग्रंथ शके १३३९ मध्ये झालेला आहे तोही याप्रमाणेच आहे. करणप्रकाशग्रंथावरून अद्यापिही कोणी गणित करितात. आणि त्याचे अभिमानी तर पुष्कळच आहेत. ग्रहलाघवांत गुरु, मंगळ, राहु हे ग्रह करणप्रकाशावरून घेतले आहेत. आणि ग्रहलाघव तर हिंदुस्थानच्या तृतीयांशाहून जास्त भागांत चालतो. यावरून आयसिद्धांत मूलरूपाने नाही तरी बीजसंस्कृतरूपाने अद्याप चालत आहे. शके १४०० पासून पुढे महाराष्ट्रांत आणि काशी एथे जे ज्योतिषाचे ग्रंथ झाले त्यांत या आर्यसिद्धांतांतील वचने आढळत नाहीत. सांप्रत या प्रांतांत आर्यसिद्धांत मूलरूपानें बहुधा प्रसिद्ध नाहीं असें वर लिहिलेच आहे. डा० केर्न याने आर्यभटीय पुस्तक, त्यास मिळालेल्या तीन प्रतींच्या आधारें छापले आहे, त्या तिन्ही प्रती मलयलम लिपीतल्या आहेत. यावरून अगदी दक्षिण हिंदुस्थानांत त्यांत विशेषतः मलबार प्रांतांत अद्याप आर्यसिद्धांत प्रसिद्ध आहे असे दिसते. तिकडे तामिळ आणि मल्याळी भाषा ज्या प्रांतांत चालते त्यांत सौरमानाचे पंचांग चालतें. तें आर्यपक्षाचे आहे. म्हणजे त्यांतलें वर्ष प्रथमार्यसिद्धांताचें आहे. वैष्णवलोक आर्यपक्षाचे अभिमानी आहेत. त्यांची विशेष वस्ती कर्नाटक, झैमूर या प्रांतांत आहे. बंगाल्यांतील पाटणा हे आर्यभटाचें स्थान समजतात. परंतु मला त्याविषयी स्थान. संशय वाटतो. कारण बंगाल्यांत आर्यसिद्धांत मुळीच चालत नाही. यावरून आर्यभटाचें कुसुमपुर हे कदाचित् दक्षिणेत असेल; परंतु याविषयीं निश्चयाने काही सांगता येत नाही. आर्यसिद्धांतांतील ग्रह युरोपियन कोष्टकांवरून निघणाऱ्या ग्रहांशी ताडून पाहिले म असतां कधीं बिनचूक येतात हे वर दिलेच आहे. (पृ. महशुद्ध १७४). परंतु त्याहून स्पष्टपणे समजण्याकरितां व विचार करितां येण्याकरिता आर्यभटीयकालचे झणजे शके ४२१ (इ. स. ४९९) मध्यम मेषसंक्रमण वेळेच्या सुमाराचे आर्यभटीयावरून काढलेले मध्यम ग्रह आणि युरोपियन कोष्टकांवरून काढलेले मध्यम ग्रह पुढे २०० व्या पृष्ठांत एकत्र दिले आहेत.