पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५६) नांवें पंचसिद्धांतिकेंत नाहीत. आणि तींत वसिष्ठ आणि रोमक सिद्धांत एकेकच आहेत. यावरून श्रीषेणाचा रोमक आणि विष्णुचंद्राचा वासिष्ठ हे शके ४२७ च्या पूर्वी नव्हते; तर मूलरोमकसिद्धांत आणि मूलवासिष्ठसिद्धांत हे मात्र होते, असे सिद्ध होते. ह्यांचा सारांश पंचसिद्धांतिकत आहे. श्रीषेण आणि विष्णुचंद्र यांनी आर्यभटावरून स्पष्टीकरणादि घेतलें असें ब्रह्मगुप्त म्हणतो. यावरूनही शके ४२१ च्या नंतर त्यांनी आपापले सिद्धांत केले हे दिसून येतेच. आणि पंचसिद्धांतिकेवरून ते ४२७ नंतर झाले असें सिद्ध होतं. रोमकसिद्धांत. वर सांगितलेल्या दोन प्रकारच्या रोमकसिद्धांतांपैकी मूलरोमकसिद्धांत मात्र पंचसिद्धांतिकाकाली होता हे वर सांगितलेच आहे. त्या रोमकसिद्धांताविषयी विचार करूं. पंचसिद्धांतिकेचा बराच भाग रोमकसिद्धांताकडे लागला आहे. पहिल्या अध्यायांत आठपासून तीन आर्यांत त्यावरून अहर्गणसाधन सांगितले आहे. १५ वींत अधिमासतिथिक्षय सांगितले आहेत. ८ वा अध्याय सर्व १८ आर्या रोमकसंबंधेच आहेत. त्यांत सूर्यचंद्रसाधन, त्यांचे स्पष्टीकरण, आणि चंद्रसूर्यग्रहणसाधन आहे. रोमकसिद्धांतावरून अहर्गण काढण्याची रीति दिली आहे तींत पहिलीच आर्या अशी आहे: सप्ताश्विवेद (१२७) संख्यं शककालमपास्य चैत्रशुक्लादौ । अर्धास्तमिते भानौ यवनपुरे भौमदिवसायः ॥ ८॥ अध्याय १. यावरून चैत्र शुक्ल प्रतिपदा भौमवारी होती असें होतें. कोणत्याही करणग्रंथांत ग्रहस्थिति काढण्याकरितां करणारंभीची ग्रहस्थिति यावी लागते. त्या ग्रहादिकांस क्षेपक म्हणतात. पंचसिद्धांतिकेंतले क्षेपक हे, वरील आर्येतील शके ४२७ हें सांप्रतच्या पद्धतीप्रमाणेच गतवर्ष धरून गणित करून पहातां त्या वर्षी मध्यममेषसंक्रमण ज्या दिवशी झाले त्या दिवशींचे, म्हणजे शके ४२७ अमांत चैत्र कृष्ण १४ रविवार तारीक २० मार्च सन ५०५ या दिवशींचे आहेत असें निघते. त्यांत कांहीं त्या दिवशी मध्यान्हीचे आहेत आणि काहीं मध्यरात्रीचे आहेत, याविषयीं कांहींच संशय नाही. पुढे सूर्यसिद्धांतविवेचनांत ही गोष्ट विशेष स्पष्टपणे दिसून येईल. या चैत्र कृष्ण १४ च्या पुढलीच शुद्ध प्रतिपदा म्हणजे वैशाख शुक्ल प्रतिपदा भौमवारी येते. हिलाच वराहमिहिराने चैत्रशुक्लपतिपदा म्हटले आहे असे सिद्ध होते. ( एरव्ही कोणत्याही पद्धतीने ४२७ चैत्र शु. १ मंगळवारी येत नाही.) आणि त्या दिवसापासून अहर्गण साधला आहे, हे ठीकच आहे. शुक्ल प्रतिपदेपासून अहर्गण साधणे सोईचे म्हणून वराहमिहिराने तसे केलें. कोणत्याही करणग्रंथावरून साधलेल्या अहर्गणास कधी कधी एकाची चूक येते; आणि वारावरून ती शुद्ध करून घ्यावी लागते; हे ज्योतिषगणितांत प्रसिद्ध आहे. आतां पूर्वोक्त प्रतिपदा ही वैशाख शुक्ल प्रतिपदा असतां तिला चैत्र शुक्ल