पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११८) दुर्योधनाचा वध झाल्यावर हे कृष्णाचे बलिरामास बोलणे आहे. या वाक्यांवरून द्वापर आणि कलि यांच्या संधीस पांडव झाले असें भारतावरून होते. आमच्या सर्व ज्योतिषग्रंथांच्या मते शककालापूर्वी ३१७९ वर्षे कलियुगारंभ झाला. ह्मणजे चालू शक १८१७ ह्या वर्षी कलियुगाची ( ३१७९ +१८१७ = ) ४९९६ वर्षे गेली आहेत. ह्मणजे पांडव झाल्यास सांप्रत सुमारे ५००० वर्षे झाली. कलियुगारंभ कधी झाला याविषयी आमच्या सर्व ज्योतिषग्रंथांची एकवाक्यता आहे. परंतु ते सर्व ग्रंथ कलियुगाची सुमारे २६०० वर्षे गेल्यानंतर झालेले आहेत. त्यापूर्वीचे *वैदिककालांतले आणि वेदांगकालांतले अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत त्यांत कलियुगारंभ कधी झाला हे ठरविण्यास काही साधनें नाहींत. ज्योतिषग्रंथांनी कलियुगारंभ केवळ ग्रहस्थितीवरून कल्पित ठरविला असें युरोपियन विद्वानांचे मत आहे, व ते विचारणीय आहे. त्याचा विचार पुढे करूं. ज्योतिषग्रंथांचा कलियुगारंभकाल खरा असेल आणि द्वापरयुगाच्या अंती पांडव झाले हे खरे असेल तर शकापूर्वी सुमारे ३२०० वर्षांपूर्वी पांडव झाले. प्रसिद्ध ज्योतिषी पहिला आर्यभट (शके ४२१ ) याने द्वापराच्या अंती भारतीयुद्ध झाले असे स्पष्ट सांगितले आहे (दुसऱ्या भागांत आर्यभटवर्णन पहा). आणि कलियुगारंभास शकारंभी ३१७९ वर्षे झाली होती असे त्याच्या ग्रंथावरून सिद्ध होत आहे. वराहमिहिर ( शके ४२७ ) म्हणतोः आसन्मघासु मुनयः शासति पृथ्वीं युधिष्ठिरे नृपतौ ।। षद्विकपंचवि (२५२६) यतः शककालस्तस्य राज्ञश्च ॥ बृहत्संहिता, सप्तर्षिचार. अर्थ-युधिष्ठिरराजा पृथ्वीचें राज्य करीत असतां मुनि ( सप्तर्षि ) मधानक्षत्रीं होते. शककालांत २५२६मिळविले म्हणजे त्या राजाचा (युधिष्ठिराचा)ही [काल येतो.] ____यावरून शककालापूर्वी २५२६ वर्षे म्हणजे कलियुगाची ६५३ वर्षे गेली, तेव्हां पांडव झाले असें वराहमिहिराचे मत आहे. आणि वृद्धगर्गाच्या मतास अनुसरून त्याने सप्तर्षिचार सांगितला आहे. तेव्हां वृद्धगर्गाचेही तसेंच मत असावे असे दिसते. राजतरंगिणीनामक काश्मीरचा इतिहास वराहमिहिरानंतर सात आठशे वर्षांनी कल्हणाने लिहिला आहे. त्यांत पहिल्या उल्लासांत पांडवांचा काल गर्गवराहांस अनुसरून गतकलि ६५३ हाच सांगितला आहे. हा गर्गवराहोक्त काल केवळ कल्पित आहे. सप्तर्षीना गति आहे, ते एकेक नक्षत्रीं शंभर शंभर वर्षे असतात, असें वराहमिहिरानें सप्तर्षिचारांत सांगितले आहे. आणि त्या समजुतीस अनुलक्षून हा काल काढिलेला आहे. परंतु सप्तर्षीस गति मुळीच नाहीं ह्मणण्यास हरकत नाही. युधिष्ठिराच्या वेळी ते मघांत होते, सांप्रतही मघांत आहेत. तेव्हां प्रत्येक नक्षत्री ते शंभर वर्षे असतात हे खरे मानले तर सांप्रत युधिष्ठिरास २७०० किंवा ५४०० (किंवा २७०० ची कोणतीही पूर्णपट ) वर्षे झाली असें निष्पन्न होईल. परंतु सप्तर्षीस गति नाही, ह्मा" महिकालांत कांही अर्थ नाही. त्याप्रमाणेच गर्गवराहोक्त कालांत नाही. हा, ती देतो.। * वैदिककालाची मर्यादा या भागाच्या उपसंहारांत ठरविली आहे. तो पुढील