पिसाळ समरस झाला तर तो राष्ट्रद्रोही कसा?" परंतु राजवाडे यांनी आपले म्हणणे सोडले नाही व हे दप्तर हाती येण्याचा मार्ग खुंटला.
वाई प्रांतांत इतिहासासंबंधी कागदपत्रे शोधीत असतां त्यांम जुनी काव्ये वगैरेही सांपडत. जुनी ज्ञानेश्वरी त्यांस सांपडली. दासोपंताचे एक बाड सांपडले दासोपंताचे काव्य छापण्यासाठी महाराष्ट्र सारस्वत म्हणून एक मासिक सुरू झाले. ते कांही दिवस चालू होते.
एकदा हे संशोधनाचे काम महत्त्वाचे म्हणून पटल्यावर राजवाडे यांनी सर्व जीवित त्यास वहावयाचे ठरविले. ठिकठिकाणी ते वणवण हिंडले. काशीपासून रामेश्वरपर्यंत जेथे जेथे म्हणून कागदाचा चिटोरा मिळण्याचा संभव, तेथे तेथे ते हिंडले. ते बलुचिस्थान व अफगाणिस्थान इकडेही गेले होते. कोठे जाण्याचे त्यांनी बाकी ठेवले नाहीं. त्याप्रमाणे सर्व ऐतिहासिक स्थळे, किल्लेकोट, गुहा, दऱ्या, राजवाडे, शिलालेख, दर्गे, लेणी सर्व त्यांनी नीट पाहिले. सर्व महाराष्ट्र त्यांच्या डोळ्यासमोर उभा असे. कधी कधी या स्थानानिरीक्षणाच्या नादाने त्यांच्यावर भयंकर संकटें ही ओढवत, परंतु दैव- साहाय्यानें ते यांतून सुरक्षित बाहेर पडले. एकदां खांदेरी उंदेरी हे मुंबई जवळील समुद्रांतील ठिकाण नीट पहाण्यासाठी म्हणून मुंबईस ते कुलाबादांडी जवळ ओहटी होती, तेव्हां गेले व सर्व प्रदेश नीट न्याहाळून पहात होते. रात्र होत आली व भरती लागण्याची वेळ आहे, याकडे त्यांचे लक्षच नव्हतें. पहारेकरी म्हणाला 'येथे रात्रीचे राहावयाचें नाहीं.' शेवटी पाण्यांतून पोहत जावयाचे त्यांनी
पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/४६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
कै. इतिहासाचार्य राजवाडे.