रखे सर्व कागद अथपासून इतिपर्यंत वाचावयाचे, या प्रमाणे त्यांनी काम केले. श्रमाची त्यांस पर्वा नसे. श्रमांसाठीच तर त्यांनी शरीर तयार केलें होतें. दोन महिन्यांत सर्वं दप्तर तपासून इतिहासासंबंधी सर्व कागद घेऊन ते पुण्यास रवाना झाले. तेथे श्रीविठ्ठल छापखान्यांत ते कागदपत्र छापण्यास सुरवात झाली. परंतु दुर्दैवाने हा श्रीविठ्ठल छापखाना जळून गेला. हा विठ्ठल छापखाना फडके वाड्यांत होता. भाषांतर मासिकाचें सर्व संपादित कार्य खाक झाले. याच सुमारास त्यांची भार्या पण मरण पावली. संसाराचा पाश तुटला व राष्ट्रप्रपंच सुधारावयास हा महापुरुष तयार झाला.
पानिपतच्या लढाईसंबंधाचे सर्व कागद घेऊन ते वाईस आले. पुन्हां सर्व बालबाधीत लिहून त्याचा ते अभ्यास करूं लागले. त्या पत्रांशी त्यांची तन्मयता पूर्णपणें झालेली होती. त्यांस खाण्यापिण्याची सुद्धां आठवण नसे. पानिपतच्या प्रचंड रणसंग्रहाची साग्र सुसंगत हकिगत जमविण्यांत ते दंग झाले. सर्व कार्य कारण भाव त्यांनी जमविले. रात्री, दिवसा, पहांटे, सायंकाळी ज्या ज्या वेळी पहावें, त्या त्या वेळी राजवाडे त्या दप्तराचा अभ्यास करीत आहेत असेंच दिसे. झोंपबीप सर्व चट पळून गेलें. काम करिता करितां जरा दमले असे वाटले ह्मणजे तेथेच डोके टेकून १०।१५ मिनिटें झोंपावयाचे; परंतु फिरून जागे होऊन कागदपत्र वाचू लागावयाचे. विठ्ठलाच्या ध्यानानें तुकोबादिकांची तहान भूक जशी हरपे तसेच या महापुरुषाचें झालें. केवळ जगण्याकरितां म्हणूनच पोटांत ते चार घांस कोंबीत व अगदी डोळे उघडत नाहीसे झाले म्हणजेच डोके टेंकीत. यावेळचीच आम्ही एक आख्यायिका आमच्या
पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/३९
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३
इतिहास संशोधन व इतिहास मंडळ