तून चाले. राजवाडे लिहितात. "एका दुष्ट खोडीने मात्र मला अतोनात ग्रासिलें. ती खोड म्हणजे दुसरी तिसरी कांहीं नाहीं. इंग्रजी बोलण्याची व इंग्रजीत विचार करण्याची. बाराव्या वर्षापासून २६ व्या वर्षांपर्यंतच्या पंधरा वर्षांत, वाचणें, लिहिण, विचार करणें वगैरे सर्व मानसिक क्रिया मी इंग्रजीत करूं लागलों. शाळेत व कॉलेजांत प्राचीन व अर्वाचीन मराठी ग्रंथांशी शिक्षकांनी व परीक्षकांनी माझी क्षणभरही ओळख करूं दिली नाही. त्यामुळे स्वभाषेंत कांहीं प्रासादिक व नामांकित ग्रंथच नाहींत, असें इतर परीक्षार्थ्यांप्रमाणें माझेंहि मत व्हावयाला कोणतीच हरकत नव्हती. तशांत कुंटे, रानडे वगैरे विद्वान् लोकहि मोठमोठी व्याख्यानें इंग्रजीत झोडीत. कॉलेजांत तर बहुतेक सर्व व्यवहार इंग्रजीतच करूं लागलों. बंधूंना व मित्रांना पत्रे लिहावयाचीं तीं इंग्रजीत आचाऱ्याशींव व गड्यामाणसाशी बोलावयाचें तेंहि मराठीमिश्रित इंग्रजीत; डिबेटिंग सोसायटीत मोठमोठी अद्वातद्वा व्याख्यानें द्यावयाचीं तीं इंग्रजीत; देशी कपडे वापरणारी मंडळी कॉलेजांत काढिली. तिचें सर्व काम इंग्रजीत; व्यायामाचे सर्व प्रकार करावयाचे ते इंग्रजीत; सारांश सतत पंधरा वर्षे बारा आणि बारा चोवीस तास सर्व कामें मी इंग्रजींत करूं लागलों. या एवढ्या अवधीत मी मराठी बहुतेक विसरून जावयाचा; परंतु दोघा तिघा गृहस्थांनी मला ह्या विपत्तींपासून वांचविलें. विष्णुशास्त्री चिपळोणकराच्या टीकात्मक निबंधांनी इंग्रजीच्या या खग्रासापासून माझा बचाव केला. काव्येतिहास संग्रहकारांच्या ऐतिहासिक पत्रांनी स्वदेश म्हणून कांहीं आहे हे मला कळले. परशुरामपंत तात्या गोडबोले ह्यांनी छापलेल्या काव्यांनी
पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/२९
Appearance