पुराणानिरीक्षण. ऐकल्या होत्या, कांहीं नुसत्या झालेल्या त्यांस कळल्या होत्या. यावरून भविष्याच्या कांहीं गोष्टी घडलेल्या पाहूनच व पूर्वीच्या घडलेल्या ऐकून भविष्यभागाच्या कर्त्यानें वायुपुराणांत लिहिल्या हें स्पष्ट होतें. वायुपु राणाचें भविष्य आंध्रभृत्यपर्यंतच होतें असें मानण्यास जरी कांहीं आधार नाहीं तरी तें तसेंच असावें, असें वाटतें. मग पुढें तें भविष्य जास्त वाढवून त्यास हल्लींच्या स्वरूपास आणलें असावें; व तें कैलकिल यवनानंतर लौकरच म्हणजे सुमारें ६०० च्या सुमारास आणिलें असावें. हल्लींच्या स्वरूपकर्त्याचे वेळों भारतीय युद्धापासून त्याच्या वेळेपर्यंत जवळ जवळ ३६००।३७०० वर्षे झाली अशी समजूत असावी; व त्या समजूतीशीं जुळेल अशी सर्व कालगणना त्यांनी बनविली असावी ! या- विषयीं दुसरीकडे विशेष खुलासा करूं ! श्रीमद्भागवतपुराण, ५ वें. आतां या पुराणाविषयीं विचार करूं. श्रीविद्यारण्यांनीं यांतून जीव- न्मुक्तिप्रकरणांत उतारे घेतलेले आहेत. ( १४ वें शतक ). श्रीमध्वाचा- यांनी ब्रह्मसूत्रभाष्यांत यांतून उतारे घेतलेले आहेत; इतकेंच नव्हे, तर " भागवततात्पर्यनिर्णय' नांवाच्या त्यांच्या ग्रंथावरून पहातां त्यांस आपल्या पूर्वीच्या भागवतावरील आठ टीका माहीत होत्या असे दिसतें; त्यांत हनुमत्, चित्सुख, शंकराचार्य यांच्याही टीकांची नांवें आहेत. श्रीधरी टीकाही मध्वाचार्याहून प्राचीनतर असावी. हेमाद्रीनें व्रतखंड व दानखंड यांत भागवताचे उतारे घेतलेले आहेत. त्याच काळच्या ज्ञानेश्वरींत भाग- बताचा आदरपूर्वक उल्लेख आहे. हेमाद्रीचा मित्र बोपदेव यानें तर भागवतावर ३ ग्रंथ लिहिले; ( १ ) मुक्ताफल, ( २ ) हरिलीला, * व
- ही हल्ह्रीं छापून प्रसिद्ध झालेली आहे.