Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. येथें ‘ पूर्ववंशजाः च्या ठिकाणी ' पुरुवंशजा: : हा पाठच असावासें दिसतें. या २५ राजांस किती काळ लोटला हे दिलेले नाहीं. तसेंच, शिशुनागवंशाचा तपशील देत असतां, उदयी अगर उदायी राजाविषय असे लिहिले आहे की, त्यानें आपल्या राज्याच्या ४ थ्या वर्षी गंगेच्या दक्षिण कांठी कुसुमपूर ( पाटलीपुत्र नगर ) निर्माण केलें. ह्याच भागांत ही माहिती मत्स्यपुराणांत आढळत नाहीं. यावरून असें सिद्ध होतें कीं वायुपुराणांतील भविष्यभाग देणारास उदायीनें आपल्या राज्याच्या कितव्या वर्षी कुसुमपूर स्थापिलें हें माहीत. होतें. या तपशिलाचें महत्त्व मत्स्यपुराणाचा भविष्यभाग लिहिणारास पुढे वाटलें नाही. त्यानें फक्त राज्यकालाचे तेवढे उतारे दिले. यावरून अधिक तप शीलवार माहिती असलेलेंच सर्वांत प्राचीनतर भविष्य होय असें मानावें लागतें. उदयीनें कुसुमपूर स्थापल्याविषयीं वायुपुराणांत याप्रकारें उल्लेख आहे:- उद- (दा) यी भविता यस्मात् त्रयस्त्रिंशत्समा नृपः ॥ स वै पुरवरं राजा पृथिव्यां कुसुमाव्यम् ॥ ३१९ ॥ गंगाया दक्षिणे कूले चतुर्थेऽब्दे करिष्यति ॥ अ० ९९ वा. 5 या तपशिलांमुळें वायुपुराणाचा भविष्यभाग लिहिणाऱ्यानेंच प्रथम भविष्यभाग पुराणांतून घालण्याचा परिपाठ पाडला असे म्हणावे लागतें; व हैं एकदां कबूल केलें म्हणजे भविष्यभागाचा पूर्वाषरभाव पुराणांमध्ये वायु, मत्स्य, ब्रह्मांड, विष्णु व भागवत या प्रकारें लागतो. महाभारताच्या सद्यःस्वरूपांत मत्स्य व वायु या दोन्ही पुराणांचा स्पष्ट उल्लेख आहे. तो असाः - इत्येतन्मात्स्यकं नाम पुराणं परिकीर्तितम् || महाभारत, ३-१८७-५८.