Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणानिरीक्षण. नानाविद्याश्रयाः प्रोक्ताः सर्वलोकोपकारकाः । एतद्विष्णुपुराणं वै सर्वशास्त्रार्थसंग्रहम् || या सूचीवरून कळून येतें कीं विष्णुपुराणाचे आदिभाग व उत्तरभाग असे दोन भाग असून, आदिभागांत ६ अंश आहेत व उत्तरभागास विष्णुधर्मोत्तर म्हणतात. विष्णुपुराणाचा पूर्वभाग व विष्णुधर्मोत्तर मिळून संपूर्ण विष्णुपुराण २३००० चे होतें. ६० हल्लीं आपणांत प्रचलित असलेले विष्णुपुराण म्हणजे केवळ त्याचा पूर्वभाग आहे; तो जवळ जवळ ७००० चा आहे. विल्सन साहेबांनीं विष्णुपुराणाच्या सात प्रति हिंदुस्थानाच्या भिन्न भिन्न भागांतून मिळवि- लेल्या होत्या; पण त्या सर्वोत इतकेच श्लोक होते; व पूर्वार्ध ६ अंशांचा संपूर्णही दिसतो. मग, हा फरक कसा पडला, असा विल्सन यांचा प्रश्न होता. * पण त्यास उत्तर एवढेंच की विष्णुपुराणाच्या पूर्वार्धातच फक्त २३००० श्लोक कसे मिळावेत ? हल्ली विष्णुपुराण व विष्णुधर्मोत्तर हे भिन्न भिन्न ग्रंथ मानले जातात; पण नारदपुराणाच्या सूचीच्या वेळीं ते तसे मानले जात नव्हते हें स्पष्ट होतें ! विष्णुपुराण व विष्णुधमांत्तर हे दोन्ही ग्रंथ श्रीशंकराचार्यांस माहीत होते; या दोहोंतूनही त्यांनी विष्णु- सहस्रनामभाष्य व सनत्सुजातीयभाष्य यांत उतारे दिलेले आहेत; पण हे दोन्ही वेगळाले ग्रंथ होते अशी त्यांची समजूत होती, हें स्पष्ट आहे. शिवाय, थोड़ीबहुत याबद्दल शंका असेल तर खालील प्रमाणावरून ती अगदीं नाहींशी होईल. विष्णुसहस्रनामभाष्यांत आचार्यांनी एके ठाई असे म्हटले आहे कीं: - विष्णुपुराणांते श्रीपराशरेणोपसंहृतम् । यस्मिन्न्यस्तमति: " इत्यादि ।

  • How is the discrepancy to be explained ?

66