Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. खंडाचा ४ थ्या ) संपूर्ण अभाव असून, कांहीं अध्यायांत मात्र पुष्कर- माहाम्य वर्णिलेले आहे. गौडदेशांतील उत्तरखंडांत मात्र खालील वर्णन आहे:- ४५ एतदादिपुराणं वः कथितं बहुविस्तरम् । पद्माख्यं सर्वपापघ्नं पंचपर्वात्मकं द्विजाः ॥ प्रथमं सृष्टिखंडं तु द्वितीयं भूमिखंडकम् । तृतीयं स्वर्गखंडं च तुर्यं पातालखंडकम् ।। पंचमं तूत्तरं खंडं प्रत्येकं मोक्षदायकम् || परिशिष्टं क्रियायोगसारं वक्ष्यामि वः पुनः । यावरून, यांत सृष्टिखंड, भूमिखंड, स्वर्गखंड, पाताळखंड, उत्तरखंड ( व परिशिष्टरूपी क्रियायोगसार ) असे विभाग केलेले आहेत हे कळून येईल. नारदपुराणांत गौड पाद्मोत्तराप्रमाणेंच पांच खंड घेतलेले आहेत; द्वितीय खंडाच्या ( भूमिखंडाच्या ) १२५ व्या अध्यायांतही ( ४८-५० ) सृष्टि- खंड, भूमिखंड, स्वर्गखंड, पातालखंड व उत्तरखंड, असेच पांच खंड दिलेले आहेत; क्रियाखंडाचें नांव नाहीं; स्वर्गखंडाच्या आरंभी मात्र ६ खंडांचें नांव ऐकूं येऊं लागलें आहे, पहा:- सहस्रं पंचपंचाशत् षड्डिः खंडैः समन्वितम् । तत्रादावादिखंडं स्यात् भूमिखंडं ततः परम् || ब्रह्मखंडं ततः पश्चात् ततः पातालखंडकम् । क्रियाखंडं ततः ख्यातं उत्तरं खंडमंतिमम् ॥ स्वर्गखंड, १-२२ ते २४. यांत आदिखंडे, भूमिखंडे, ब्रह्मखंडे, पाताळखंड, क्रियाखंड, व उत्तर- खंड असे सहा खंड झालेले आहेत, तुलनेकरितां चारी एकदम देतों.