पुराणनिरीक्षण. आहेत. दुसरे एक आदिब्रह्मपुराण म्हणून मिळतें; त्यांत जरूर ८००० श्लोक व १२५ अध्याय आहेत; यावरून १० हजार लक्षणाचा हाच ग्रंथ असावा. पुण्यास छापलेल्या ब्रह्मपुराणांत १३, ७८३ श्लोक आहेत. मत्स्य- पुराणांत सांगितल्यापेक्षां यांत ७८३ श्लोक अधिक आहेत; ते लेखकप्रमादानें किंवा माहात्म्यरूपानें वाढलेले दिसतात. आदिब्रह्मपुराण लखीमपूर व लखनौमध्ये छापलेलें आहे. ब्रह्मपुराण ( १३००० वर श्लोकांचं व २४३ अध्यायांचें ) व आदि- ब्रह्मपुराण ( १२५ अध्यायांचे ) यांत वरेंच साम्य आहे. आदिब्रह्मपुराणांत प्रचालित ब्रह्मपुराणांतील बहुतेक कथा मिळतात. यांवरून हें आदि- ब्रह्मपुराण कदाचित् त्यावर संस्कार होण्यापूर्वीचे असावें. हल्लींच्या पुराणांतून अनेक ठाई आदिपुराणांचा उल्लेख येतो; यावरून मूळ पुराणें पूर्वी असली पाहिजेत हैं अनुमान पूर्वी काढिलेलेच आहे; व तीं एकच नसून अनेक होती. आदिब्रह्मपुराण हे व्यासांच्या आदि- पुराणांपैकी एक असावें, असें वाटतें. विल्सन यांस सांपडलेल्या ब्रह्म- पुराणांत ७ ते ८ हजार श्लोक होते; तेव्हां त्यास हेंच आदिब्रह्मपुराण मिळाले असावें. त्यास ब्रह्मोत्तरपुराण म्हणून आणखी सुमारें ३ हजार श्लोक असलेला भाग मिळाला होता. याप्रमाणे सुमारे १० हजारांवर ब्रह्म व ब्रह्मोत्तर मिळून त्याची श्लोकसंख्या झाली होती. वरील ब्रह्मो- त्तरपुराण हें स्कंदपुराणांतील ब्रह्मोत्तरखंडाहून भिन्न होय. ब्रह्मोत्तर- पुराण स्वतंत्रच ग्रंथ असावा, असा विल्सनचा तर्क आहे. 6 पुराणांच्या यादीमध्यें ब्रह्मपुराणासच अग्रस्थान दिलेले असल्यामुळे, यास आदिपुराण' असेही म्हणण्याची चाल आहे; तसेंच यांत सूर्याचें माहात्म्य असल्यामुळे यास सौरपुराणही म्हणतात; पण पुराण' व ' सौरपुराण' नांवांची दुसरी उपपुराणेंही आहेत; त्यांशी या ' आदि- महापुराणाचा घोटाळा मात्र करूं नये. ४२
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/५७
Appearance