पुराणानिरीक्षण, प्रासादा ( मंदिरा ) चे माहात्म्य ' पुरुषोत्तम-माहात्म्य " ग्रंथांत आहे; तेथें ' गांगेय ' पद आहे. हल्लींचें पुरुषोत्तममंदिर गंगेश्वर चौंड यानें बांधिलें. हा इ.स. १०७७ मध्यें कलिंग देशाचा अधिपति झाला. त्यानंतर ३० - ३५ वर्षांनी म्हणजे इ. स. ११०७ ते १२ पर्यंत त्यानें पुरुषोत्तम मंदिर बांधिलें ! हा चौड गंगेश्वर व वल्लाळसेन ( दानसागराचा कर्ता ) हे दोघेही समकालीन होते. दानसागरांत ब्रह्मपुराणांतील उतारे आहेत हैं वर सांगितलेलेच आहे; यावरून प्रचलित ब्रह्मपुराण वरील जगन्नाथमंदिरा- हून प्राचीनतर आहे हें सिद्ध होतें. सेन राजांपैकी लक्ष्मण राजाच्या शिलालेखांत पुरुषोत्तम क्षेत्राचा उल्लेख आहे. सातव्या शतकांतील चिनी प्रवासी हुएन्सांग यानें 'चित्रोत्पल' पुरीस येऊन तेथील पांच प्रासादांच्या उंच शिखरांचें अवलोकन केलेलें होतें. यावरून गंगेश्वरानें बांधिलेल्या प्रासादापूर्वी उत्कल देशांत पुरुषोत्तमप्रासाद होता. नवीन नवीन देवळें होतात; कित्येक जीर्णोद्धारही होतात. यामुळें, वरील प्रमाणानें जगन्नाथाच्या देवळानंतर हें पुराण झालें असें मानतां येत नाहीं. प्रायः सर्व देशी व विदेशी पंडित म्हणतात की, प्रचलित विष्णुपुराण हल्लींच्या सर्व पुराणांत प्राचीन आहे. ब्रह्मपुराणांतील कृष्णचरित्र व विष्णु- पुराणांतील कृष्णचरित्र यांची, व तशीच ब्रह्मपुराणांतील पुरुषोत्तम- माहात्म्य व नारदमहापुराणांतील पुरुषोत्तममाहात्म्य यांची तुलना करून पहातां असें दिसून येईल की, ब्रह्मपुराणावरूनच विष्णुपुराण व नारदपुरा- णांनी आपापले भाग वाढवून तयार केलेले आहेत. ( ब्रह्मपु० अ. १८-२१ ते २४ श्लोक यांची तुलना विष्णुपुराण, अंश ५-१३ अध्याय, श्लोक २३ ते २८ व ८२ यांशी करून पहा. तसेंच, ब्रह्मपु० ५०- श्लोक ४८- ५६ यांची तुलना नारदपुराण, पूर्वभाग, ५४ अध्याय, श्लोक ५८-६५ यांशी करून पहा. ) यांवरून कळून येईल की, विष्णु व नारद यांपेक्षां ब्रह्मपुराणच प्राचीन आहे.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/५५
Appearance