Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण २ रें. प्रत्येक पुराणाविषयी माहिती. ब्रह्मपुराण, १ लें. मत्स्यपुराणांत याचें लक्षण असे दिलेले आहे कीं: - ब्रह्मणाभिहितं पूर्वं यावन्मात्रं मरीचये । ब्राह्मं त्रिदेशसाहस्रं पुराणं परिकीर्त्यते ॥ मत्स्यपु. ५३-१३. प्रचलित ब्रह्मपुराणाच्या पहिल्या अध्यायांत म्हटले आहे की:- कथयामि यथापूर्वं दक्षाद्यैर्मुनिसत्तमैः । पृष्टः प्रोवाच भगवानब्जयोनिः पितामहः ॥ ९१-३३. यावरून विल्सन साहेबांस वाटले की, मरीचीला ब्रह्मदेवानें सांगितलेले ब्रह्मपुराण व प्रचलित ब्रह्मपुराण वेगळें ! पण ( २६-३६ ) मध्यें कित्येक हस्तलिखित प्रतींत आहे पाठ आहे:- - मैरीच्याद्यास्तदा देवं प्रणिपत्य पितामहम् । इममर्थमृषिवराः पप्रच्छुः पितरं द्विजाः ॥ २६ - ३६. वास्तविक पहातां प्रचलित ब्रह्मपुराणांत २७ वे अध्यायापासून अखेरपर्यंत ब्रह्मा वक्ता व मरीच्यादि मुनिगण श्रोते आहेत. ( निदान ९१ व्या . १ ' ब्राह्मं तु दशसाहस्रं ' असा विलसनचा पाठ होता. अपरार्काच्या वेळीं हाच पाठ होता. २ येथें पुण्याच्या ब्रह्मपुराणांत ' भृग्वाद्या: ' असा पाठ आहे.