Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिलें.

ब्राह्म १० हजार, पाद्म ५५ हजार, विष्णु २३ हजार, वायु ऊर्फ शैव २४ हजार, भागवत १८ हजार, नारद २५ हजार, मार्केडेय ९ हजार, अग्नि १५४००, भविष्य १४५००, ब्रह्मवैवर्त १८ हजार, लिंग ११ हजार, वराह २४ हजार, स्कंद ८११००, वामन १० हजार, कूर्म १७ हजार, मत्स्य १४ हजार, गारुड १९ हजार, व ब्रह्मांड १२ हजार-येणेंप्रमाणें चार लक्ष ग्रंथ होतो. बाराव्या शतकांतील अपरार्कानें याज्ञवल्क्यस्मृतीवरील आपल्या टीकेंत खालील पौराणिक ग्रंथांतून उतारे घेतलेले आहेत:- पद्मपुराण, कूर्मपुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांडपुराण, भविष्यपुराण, मत्स्य- पुराण, मार्केडेयपुराण, लिंगपुराण, वराहपुराण, वामनपुराण, वायुपुराण, विष्णुपुराण व स्कंदपुराण हीं महापुराणें ; व आदिपुराण, आदित्यपुराण, कालिकापुराण, देवीपुराण, नंदिपुराण, नृसिंहपुराण, भविष्योत्तरपुराण, विष्णुधर्म, विष्णुधर्मोत्तर, विष्णुरहस्य, शिवधर्मोत्तर हे इतर पौराणिक ग्रंथ. वायुपुराणांत आदिपुराणाची संख्या १०६०० दिलेली आहे. श्रीशंकराचार्यांनी खालील ग्रंथांतील उतारे घेतलेले आहेत :- विष्णुपुराण, विष्णुधर्म, विष्णुधर्मोत्तर, भविष्यपुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्म- वैवर्त, पद्मपुराण, लिंगपुराण, नृसिंहपुराण, कूर्मपुराण, ( ईश्वरगीता व व्यासगीता ), ब्रह्मांडपुराण ( कावषेयगीता ) इत्यादि. प्रचालत पुराणांपैकी वायु, विष्णु, भागवत व मात्स्य हीं पुराणें कलियुगांतील भविष्यकाळच्या राजवर्णनाशिवाय बाकीच्या सर्व भागांत प्राचीन दिसतात असें विल्सनचें मत आहे. “ It is also to be remarked that the Vāyu, Vishnu, Bhagawat and Matsya Puranas, in whioh the particulars ३