Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० पुराणनिरीक्षण. प्रमाणें मत्स्यपुराणाच्या पुराणवर्णनाच्या प्रसंगी (सुमारें इ० स० २०० ते ३०० ) सव्वा पांच लक्ष पौराणिक वाङ्मय भारतवर्षात प्रचलित होतें; पहा:- एवं सपादाः पंचैते लक्षा मयें प्रकीर्तिताः ॥ मत्स्य,५३-७२. ब्रह्मांडपुराण इसवी सनाच्या पांचव्या शतकांत भारतीयांनी आपल्या बरोबर यवद्वीपांत व वाली (बाल ) द्वीपांत नेले. याच्या बरोबरच त्यांनीं महाभारत व रामायणही नेलें होतें. तसेंच कामंदकीयनीतिही त्यांनी नेली होती. हल्ली वालीद्वीपांत कवीभाषेत हे ग्रंथ प्रचलित आहेत. यवद्वीपांत सर्वभाषांत ब्रह्मांडपुराणाचें भाषांतर झालेलें आहे. डॉ० फ्रेड्रिक यांनीं तेथें उपलब्ध झालेल्या ब्रह्मांडपुराणाचें विस्तृत विवरण केलेले आहे व कित्येक श्लोकही प्रसिद्ध केलेले आहेत; जसे:- अग्रे ससर्ज भगवान्मानसानात्मनः समान् । हल्लींचें ब्रह्मांड,६-६७. ततो देवासुरपितॄन् मनुष्याख्योऽसृजत्प्रभुः । हल्लींचें ब्रह्मांड, ९-२. फ्रेड्रिक साहेबानें ब्रह्मांडपुराणाचा सृष्टिवर्णनप्रसंग, जगदुत्पत्ति, ब्रह्म- देवापासून सनकादिक मानसप्रजोत्पत्ति, माहेश्वरप्रादुर्भाव, कल्पवर्णन, देवासुरांची उत्पत्ति, मन्वंतरयुगादिनिर्णय, सप्तद्वीपविवरण इत्यादि ज्या ब्रह्मांडपुराणाच्या म्हणून कथा दिलेल्या आहेत त्या सर्व हल्लींच्या ब्रह्मांड- पुराणांत मिळतात; फक्त तेव्हां भविष्यद्राजवर्णनाचा भाग मात्र त्यांत नव्हता. यावरून इ० स० ४०० सुमारास ब्रह्मांड ( ऊर्फ वायु- ) पुरा- ¨णांत भविष्याचा भाग नव्हता हे कळून येईल. यानंतर भारतवर्षात कैलकिल यवनानंतर इ. स. ५००-६०० च्या दरम्यान भविष्यें जोडण्याचा दुसरा संस्कार पुराणांवर झाला ! नंतर मतांच्या प्रवृत्तीच्या काळांत कोणी कोणी कांहीं कांही भाग घुसडून देऊं लागला ! याप्रमाणे पुराणांवर ३-४