Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. सर्ग, वंश, मन्वंतरें व वंशानुचरित हीं जरी सांगावयाची असली, तरी ती सर्व एका धर्मनिर्णयासाठीं उदाहरणरूपानेंच होय. १८ पुराणांचा जीव इतिहास नव्हे, पुराणांचा जीव भूगोल नव्हे, पुराणांचा जीव केवळ विद्याही नव्हे; तर पुराणांचा जीव धर्मनिर्णय हा आहे. तेव्हां पुराणग्रंथांत इतिहास, भूगोल, विज्ञान, कालगणना, इत्यादि विषय आले नसले किंवा ते व्यवस्थित नसले तर मोठेंसें नवल नाहीं; तथापि, हेही विषय हल्लींच्या पुराणांतूनही आहेत, हैं या पुस्तकावरून कळून येईल. F शिवाय, अशा ग्रंथांत आपण हल्ली ज्यास इतिहास समजतो तसा इतिहास आला नाही तर विशेष वाईट वाटण्याचे कारण नाही. याविषयीं व्हिस डेविड्स हे आपल्या ' बौद्ध भारतवर्ष ' या पुस्तकांत लिहितात की:- "It jars upon the readers to hear the Chronicles called the mendacious fictions of unserupulous monks. Such ex- pressions are inaccurate; and they show a grave want of appreciation of the points worth considering. Just as in the case of Megasthenes, of the early English Chroniclers, it would be unreasonable to expect that sort of historical training which is of quite recent gronoth even in Europe The hypothesis of deliberate lying, of conscious forgery, is generally discredited. What we find in such chronicles is not indeed sober history, as we should now understand the term; but neither it is fiction. It is good evidence of opinion as held at the time when it was written. Buddhist India, P. 274. " ..... व्यासोत्तरकालीन पुराणांचें स्वरूप. याविषय पुढें प्रत्येक पुराणाचे वेळेस त्या त्या पुराणाविषयी विवेचन केलेलेंच आहे. मुख्य प्रश्न असा आहे की, व्यासांनी पुराणें प्रचलित केली