पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०३ प्रकरण पांचवें. अहुरमझ्द पवित्र झरतुष्ट्रास म्हणाला की, पूर्वी राहण्यास योग्य नसलेले प्रदेश मीं हल्ली वास्य केलेले आहेत. मीं हैं केलें नसतें तर सर्व जीवंत प्राणी आर्यणवीजोला परत गेले असते. " मीं अहुम्मझ्द प्रथम सर्वोकृष्ट असा आर्यणवीजो प्रदेश उत्पन्न केला. नंतर अंग्रमन्युस् ह्या संहारकानें त्याविरुद्ध एक मोठा अहेि उत्पन्न केला व देवांची कृति असा हिम ( बर्फ ) उत्पन्न केला. तेथे हिवाळ्याचे दहा महिने असून, उन्हाळ्याचे दोनच महिने आहेत. " मीं नंतर दुसरें उत्कृष्ट स्थान Gàn गाऊ निर्माण केलें, व त्यांतच Sughdha सुघ्ड आहे. " मी नंतर तिसरें उत्तम स्थान पवित्र मोठें Mouru मौरु उत्पन्न केले. “ नंतर मी चौथें उत्तम स्थान वैभवयुक्त Bakhdhi बखूदी उत्पन्न " नंतर पांचवें उत्तमस्थान Nishi निषाई उत्पन्न केलें; ( हें मौरु व बखूधी यांच्या मध्ये आहे. ) " नंतर मी साहावें उत्तम स्थान Haroyu हरोयु उत्पन्न केलें; त्यांत पुष्कळ पाणी आहे. " नंतर मीं सांतवें उत्तम स्थान Vaekereta उत्पन्न केलें, तेथेंच Dujak आहे. " नंतर मीं आठवें उत्तम स्थान गवताळ प्रदेशाचें Urva नांवाचें उत्पन्न केले. " नंतर नववें उत्तम स्थान Khmenta ख्मेन्टा उत्पन्न केले त्यांतच Vehrkana आहे. " नंतर दहावें उत्तम स्थान वैभवयुक्त Haraqaite उत्पन्न केले. " नंतर अकरावें उत्तम स्थान Haetumat उत्पन्न केलें; तें प्रकाशमान व संपत्तिमान आहे.