पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पांचवें. ३०१ ० ॰ यूननें या टैंकडीला तिच्या भयाण व निर्जन देखाव्यावरून ' बि-दौलत् ' असें नांव ठेविलें ! यावरून मेरुपर्वत हिंदुस्थानच्या बाहेर गांधार देशचे उत्तरेला हिंदुकुशच्या वर होता हैं कळून येईल. " ‘

  • क. विलफर्ड यांची कित्येक भौगोलिक मतें !

पुराणांतील रम्यक ' किंवा ' रमणक ' वर्ष हैं ' रोमक ऊर्फ इटालीचें नांव असावें. 'क्रौंचद्वीप ' म्हणजे बाल्टिकजवळील प्रदेश असून, स्कंदानें ज्या क्रौंचद्वीपाजवळ वस्ती केली तो प्रदेश 'स्कंद- नाभि ' ऊर्फ ‘ स्कंदिनेव्हिया' या नांवानें प्रसिद्ध आहे. केतुमाल म्हणजे यूरोप, आफ्रिकेचा उत्तर किनारा, व आशिया मैनर हे प्रदेश होत. पुष्करद्वीप म्हणजे आईसलंड होय. श्वेतद्वीप हैं इंग्लंड असून ‘ जर्मन ओशन ' लाच क्षीरसमुद्र असें नांव असावें. क्षीर याचें Kheri खीरिया रूप होतें. श्वेतद्वीपाभोवतीच्या अमृतोदधला ' अमलकीयनसी' म्हटले आहे. 6 66 या मध्य आशियांतील मेरुपवंताजवळच सीता, चक्षु, आलकनंदा व भद्रा या नद्या उगवतात असें ब्रह्मपुराणाच्या १८ व्या अध्यायांत म्हटले आहे. भद्रा पूर्वेस भद्राश्व प्रदेशांतून ( चीन मधून ) वाहते व पूर्वसमुद्रास मिळते असें म्हटले आहे. हीच होहांगहो असावी. अलकनंदा दक्षिणेस भारत वर्षातून वाहते व दक्षिणसमुद्रास मिळते, असे म्हटले आहे. चक्षु केतुमालांतून पश्चिमेकडे वाहत जाऊन समुद्रास मिळते असे म्हटले आहे; हीच oxus नदी असावी. सीता ( सीता ) ही उत्तरेस उत्तरकुरूंमधून वाहात जाऊन उत्तर अंबोनि ( धीस मिळते म्हणून म्हटले आहे. ही सैबरियांतून वाहत जाऊन उत्तर समु- द्रास जाऊन मिळणारी एकादी नदा असावी.

  • हीं मतें ' आशियाटिक रिसर्चेस' मध्ये प्रसिद्ध झाली आहेत; अकरावें

खंड पहा. + पुष्करद्वपाचे वर्णनास, तो उत्तर ध्रुवाजवळ होता व तेथें सहा महिन्यांची रात्र व सहा महिन्यांचा दिवस होता असें वर्णन असल्यामुळे हेंच अधिक जुळतें.