प्रकरण चौथें. २८७ ( १ ) भाष्यानुक्रमणी, ( २ ) छंदोनुक्रमणी, ( ३ ) देवतानुक्रमणी ( ४ ) अनुवाकानुक्रमणी, (५) सूक्तानुक्रमणी, ( ६ ) ऋग्विधान, ( ७ ) पादविधांन, ( ८ ) बृहद्देवता, ( ९ ) प्रातिशाख्य ( बहुच ), (१०) स्मृति. * हा शौनक आपल्या प्रातिशाख्यांत नानाठाई व्याडीचा उल्लेख करितो; जसें :-- उभे व्याडि: समस्वरे. ( ३ – १३ ) व्याडिस्तौ चत्परौ खरौ (३-८) व्याडिशाकल्यगार्ग्या: ( १३-३८ ) व्याडिर्नासिकानुनासिकं वा (१३- ४४ ) या व्याडीनें ' विकृतिवल्ली' व ' संग्रह ' असे दोन ग्रंथ लिहि- लेले आहेत. विकृतिवलांत व्याडि शौनकाचा उल्लेख करितोः-- उदात्तादिनिधानं तच्छौनकोक्तं भवेदिह । वि.व, १-१५. यावरून, प्रातिशाख्यकार शौनक व वल्ली व संग्रहकार व्याडि हे दोघेही (व्याकरणावर लिहिणारे) समकालीन दिसतात; पण पुढील वाक्यावरून याविषयी शंकाही राहत नाहीं; पहा:-- नत्वाऽदौ शौनकचार्य गुरुं वेदमहानिधिम् । मुनीद्रं सर्ववेदज्ञं ब्रह्मज्ञं लोकविश्रुतम् ॥ व्याडीची विकृतिवल्ली १ २. यावरून प्रातिशाख्यकार शौनक हे व्याडीचे गुरु होते हैं कळून येईल.
- या शौनकस्मृतीचा हल्लींच्या भार्गवी मानवसंहितेत उल्लेख आहे:-
शूद्रावेदी पतत्यत्रेः उतथ्यतनयस्य च । शौनकस्य सुतोत्पत्त्या तदपत्यतया भृगो : ॥ ३-१६ यावरून भृगूक्तमानवसंहिता शौनकोत्तर अत एव व्यासोत्तरकालीन आहे हें सिद्धच होतें ! ! !