प्रकरण चौथें.. २७७ लेला आहे, त्यार्शी जुळते !!! ऐल पुरूरवा मांधात्याचा समकालीन होता. त्याचाही काळ कल्प ९२५ चा सुमारचा असावा. वैशंपायन जनमेजया म्हणतात की:- पुरोस्तु पौरवो वंशो; यत्र जातोऽसि पार्थिव । इदं वर्षसहस्राणि राज्यं कारयितुं वशी ॥ भारत, १-८५-३५. मत्स्यपुराणांत (अ. ३४ ) याच श्लोकाचा पाठ असा आहे की:- पुरोस्तु पौरवो बंशो; यत्र जातोऽसि पार्थिव । इदं वर्षसहस्रात राज्यं कारयितुं वशी ॥ या श्लोकांवरून पौरववंशस्थापकापासून जनमेजयाच्या अभिषेकापर्यंत सुमारें एक हजार वर्षे गेली असे म्हणण्याचा कवीचा रोख दिसतो. ऐल पुरूरवा हा या वंशाचा स्थापक; त्याचा काळ सुमारें कल्प ९२५. आतां जनमेजयाचा राज्याभिषेक केव्हां झाला तें पाहूं. भारतीययुद्ध कल्प १८३९ मध्ये झालें. पंधरा वर्षांनी परीक्षित् राज्यावर बसला; नंतर त्यानें ६० वर्षे राज्य केलें; मग जनमेजय राज्यारूढ झाला. तेव्हां, जनमेजय राज्या झाला त्यावेळी कल्पाचीं (१८३९ + १५ + ६० = ) १९१४ वर्षे त्याच्या वेळेपर्यंत झालेलीं होतीं; म्हणजे ऐल पुरूरव्यापासून सुमारें १००० च ( १९१४ - ९२५ = ९८९ ) वर्षे झालीं ! ! ! ऐलाचा राज्य- प्रारंभ ९२५ च्याही पूर्वी १०/१२ वर्षे झालेला असणें संभवनीय आहे. याप्रमाणें, चंद्रवंशाचा प्रारंभ सुमारें कल्प ९९४-९१५ स झालेला असावा ! जनकवंशाचा प्रारंभ. निमीचा वंशही चंद्रवंशाप्रमाणेंच इक्ष्वाकूपासून लगेच सुरू झाला नसावा. निमि हा इक्ष्वाकूचा वंशज असला तरी पुत्र नसावा. कारण,
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२९२
Appearance