9 प्रकरण ४ थें. पौराणिक इतिहास. पौराणिक कालगणनेविषय केलेल्या विवेचनावरून कळून येईल की, व्यासांच्या आदिपुराणांत कांहीं तरी व्यवस्थित कालगणना होती व त्यामुळे इतिहास उत्तम रीत्या समजत असे; पण विक्रमाच्या वेळच्या व पुढील 'पौराणिकांनी सर्वच घोंटाळा माजवून पौराणिक इतिहास अत्यंत गढूळ केला. पुनः आतां या गढूळ पाण्यांत ज्ञानाच्या निवळीचें वीं उगाळून घालून या कल्पाचा भारतीय इतिहास विशद करण्याचा माझा प्रयत्न आहे. हल्लींचा कल्प स्वायंभुव मनूपासून सुरू झालेला आहे. यामुळे स्वायं- भुव मनूपासून इतिहासाचें अवलोकन करूं. स्वायंभुव मनूपासून पृथुवैन्या- पर्यंत आपल्यांत राजसंस्था नव्हती; पेट्रिआर्क ( प्रजापतिअंमलाची ) पद्धति होती. पृथुवैन्य हा भारतीयांचा पाईला राजा होय ! स्वायंभुव मनूपासून वैवस्वत मनूपर्यंत १९ पिढ्या पुराणांनी दिलेल्या आहेत; आपण वैवस्वतमनूपासून सूर्यवंशाची तपासणी करूं. वैवस्वत मनूचा पुत्र इक्ष्वाकु यानेंच प्रथम आर्यावर्तात यऊन राज- धानी स्थापिली. — क्षुवतस्तु मनोर्जज्ञे इक्ष्वाकुर्घाणतः सुतः । तस्य पुत्रशतज्येष्ठाः विकुक्षिनिमिदंडकाः ॥ ४ ॥
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२८३
Appearance