पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६२ पुराणानिरीक्षण. प्रारंभ युद्धाला लावण्यांत आला तो चुकून होय ! हा खरोखर कल्पा- चा प्रारंभच होय ! आर्यभटाच्या वेळी कल्पापासून ३६०० वर्षे झाली होतीं; तेव्हां इ० स० ( ३६०० - १८३९ + १२६३ = ) ५०८ हा काळ होता ! आर्यभटानें असा विचार केला असावा कों, कलि जर १२०० वर्षीचा तर कल्पारंभापासून आपल्या वेळेपर्यंत ३६०० वर्षे होऊनही अद्यापि कलिच कसा राहिला ? तेव्हां १२०० हीं ' मानवी वर्षे नसून ' दैवी' असावींत असें त्यानें ठरवून कलि १२०० X ३६० = ४३२००० वर्षांचा केला असावा. यावरून सूर्यसिद्धांत, विष्णुपुराणादि ४३२००० वर्षाचें कलियुग सांगणारे ग्रंथ आर्यभटानंतरचे होत हैं स्वतएव सिद्ध होतें ! व हें विद्वानांस इतर प्रमाणांवरूनही मान्य आहे. आतां, आसन् मघासु मुनयः शासति पृथ्वीं युधिष्ठिरे नृपतौ । षद्विकपंचद्वियुतः शककालस्तस्य राज्ञश्च ॥ हा श्लोक गर्गाचा म्हणून देतात. हा गर्ग इ० स० २ ऱ्या शतकांतला असें कोणी म्हणतात. यांत ' शककाला' च्या ठाई ' शाक्यकाल ' घ्यावा, असें रा. अय्यर सुचवितात. जर अय्यर यांची सूचना पसंत केली, तर बुद्धाच्या निर्वाणाच्या काळापर्यंत २५२६- किंवा २५६६ वर्षांचा काळ गेला होता, असें गर्गास माहीत होते; पण हा काळ युधिष्ठिरा पासून शाक्यकाला ' पर्यंत असे त्याने दर्शविलेले आहे; पण २५२६ किंवा २५६६ हा बुद्धनिर्वाणापर्यंतचा काळ - जर बुद्धकाळीं तशी खरोखर एकादी परंपरा असेल तर-कल्पारंभापासूनचाच असला पाहिजे. कसा 6 तो पहा:--